तुमच्या घरासाठी कोणता सोलर पॅनल सर्वोत्तम? मोनोक्रिस्टलाइन, पॉलीक्रिस्टलाइन आणि बायफेशियल यातील फरक समजून घ्या…
आपल्या घराला सोलर पॅनल लावण्याआधी योग्य तंत्रज्ञानाची निवड करणे महत्वाचे असते. मोनोक्रिस्टलाईन, पॉलीक्रिस्टलाईन की बायफेशियल पॅनल तुमच्या घराला चांगले आहेत हे जाणून घेऊयात...

सर्वसाधारणपणे, सर्व सौर पॅनेल दिसायला सारखे असतात, परंतु त्यामध्ये वापरलेल्या तंत्रज्ञानावरून ते किती वीज निर्माण करतील हे ठरत असते. अशा परिस्थितीत, आपल्या घरावर सौर पॅनेल बसवण्याआधी आपल्या घरासाठी कोणते पॅनेल योग्य असेल हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. भारतीय घरांमध्ये, छतावरील पाण्याच्या टाक्या, पोटमाळा आणि व्हेंटिलेशन यांसारख्या गोष्टींमुळे उपलब्ध सूर्यप्रकाशाचे प्रमाण कमी होते. अशा परिस्थितीत, योग्य पॅनेल निवडणे देखील आवश्यक ठरते.
आपल्या घराच्या छतावर सोलार पॅनेल बसवण्यापूर्वी, योग्य तंत्रज्ञान निवडणे खूप महत्त्वाचे आहे. कमी जागेत जास्त वीज निर्माण करणारे मोनोक्रिस्टलाइन, स्वस्त पॉलीक्रिस्टलाइन आणि दोन्ही बाजूंनी वीज निर्माण करणारे बायफेशियल पॅनेल या पर्यायांपैकी कोणता पर्याय तुमच्या घरासाठी योग्य आहे, हे सोप्या भाषेत समजून घ्या.
आपल्या घरासाठी सौर पॅनेल निवडताना, क्षमतेव्यतिरिक्त, आपल्या घराचा विजेचा वापर, छतावरील सावलीचा अंदाज आणि वीजपुरवठ्यातील व्यत्ययाची स्थिती या बाबींचाही विचार करणे महत्त्वाचे आहे.
मोनोक्रिस्टलाइन की पॉलीक्रिस्टलाइन पॅनेल?
सौर ऊर्जेसाठी पॅनेल निवडत असताना तुम्हाला मोनोक्रिस्टलाइन आणि पॉलीक्रिस्टलाइन या दोन तंत्रज्ञानाचे पॅनेल आढळतील. एकाच सिलिकॉन क्रिस्टलपासून बनवलेले मोनोक्रिस्टलाइन पॅनेल कमी जागेत जास्त वीज निर्माण करू शकतात. मात्र, थोडे स्वस्त असलेले पॉलीक्रिस्टलाइन वीज निर्मितीच्या बाबतीत ते मोनोक्रिस्टलाइन पॅनेलपेक्षा कमकुवत असते आणि त्याला जास्त जागेचीही गरज लागते. त्याचप्रमाणे, थिन-फिल्म पॅनेल वजनाने हलके आणि लवचिक असतात, परंतु घरांच्या वापरासाठी त्यांना पसंती दिली जात नाही.
याशिवाय PERC, TOPCon आणि HJT सारखी नवीन सेल तंत्रज्ञान प्रगत मोनोक्रिस्टलाइन पॅनेलमध्ये येत आहेत. त्यामुळे पॅनेलच्या वीज निर्मिती क्षमतेत मोठ्या प्रमाणात वाढ होते.
जास्त तीव्र प्रकाश म्हणजे जास्त वीज नव्हे
लोकांना अनेकदा असे वाटते की, पॅनेलला जितका जास्त सूर्यप्रकाश आणि उष्णता मिळेल, तितकी जास्त वीज ते जास्त निर्माण करेल, परंतु प्रत्यक्षात, जास्त गरम झाल्यामुळे सौर पॅनेलची कार्यक्षमता कमी होते. इतकेच नाही तर, जर पॅनेलवर जास्त सावली पडली, तर वार्षिक वीज उत्पादन देखील लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते.
या समस्येवर उपाय म्हणून आजकाल बायफेशियल पॅनेलदेखील प्रचलित आहेत. या सौर पॅनेलचे वैशिष्ट्य म्हणजे ते पुढच्या तसेच मागच्या पृष्ठभागावरून परावर्तित होणाऱ्या प्रकाशापासून वीज निर्माण करते. मात्र, याचा फायदा तेव्हाच होतो, जेव्हा ते योग्य उंचीवर आणि स्वच्छ पृष्ठभागावर बसवले जाते.
विजेच्या गरजेकडे लक्ष द्या –
आपल्या घराला सौर पॅनेल निवडताना, तुम्ही २० टक्के नियम लक्षात ठेवला पाहिजे. याचा अर्थ असा की, तुम्ही असे तंत्रज्ञान निवडावे, ज्याची क्षमता तुमच्या घराच्या सामान्य वीज वापरापेक्षा अंदाजे २०% जास्त असेल. यामुळे ढगाळ हवामानात किंवा सूर्य मावळत असतानाही तुमची वीज संपणार नाही याची खात्री होईल.
यासोबतच, तुमच्या वीजेच्या गरजा देखील समजून घ्या. जर तुमचे एकमेव ध्येय विजेचे बिल कमी करणे असेल, तर तुम्ही ऑन-ग्रीड सिस्टीम बसवू शकता. तसेच, जर तुमच्या परिसरात वीजपुरवठा खंडित होत असेल, तर तुम्ही बॅटरी बॅकअप असलेल्या हायब्रीड सिस्टीमचा पर्याय देखील निवडू शकता. पॅनेलच्या खर्चासोबतच, बजेटमध्ये इन्व्हर्टर, माउंटिंग स्ट्रक्चर आणि इन्स्टॉलेशनचा खर्च समाविष्ट करायला विसरू नका.