काश्मिरी महिला इतक्या सुंदर का असतात? विदाऊट मेकअप सौंदर्याचं नक्की रहस्य काय ?

काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते.पण तिथली लोकही तेवढीच आकर्षक असतात. मेकअप न करातही तिथल्या मुली नेहमी सुंदर आणि आकर्षक दिसतात. यामागील नक्की रहस्य काय आहे? जाणून घेऊयात. 

काश्मिरी महिला इतक्या सुंदर का असतात? विदाऊट मेकअप सौंदर्याचं नक्की रहस्य काय ?
Why are Kashmiri women so beautiful
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2025 | 3:53 PM

काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते. काश्मीरच्या दऱ्या नेहमीच लोकांना आकर्षित करतात. लोक वेगवेगळ्या ठिकाणांहून येथे भेट देण्यासाठी येतात. तसेच काश्मीरची अजून एक खासीयत म्हणजे तिथले लोक. तिथले लोक फार आकर्षित दिसतात. काश्मिरी मुली देखील खूप सुंदर मानल्या जातात. पण त्यांचे सौंदर्य मेकअपमुळे नसते. त्यांच्या सौंदर्याचे रहस्य त्यांच्या दैनंदिन दिनचर्येत लपलेले आहे. चला जाणून घेऊया त्याबद्दल.

बर्फाच्या थंड पाण्याने आंघोळ 

1961 मध्ये JAMA मध्ये काश्मीरबद्दल प्रकाशित झालेल्या एका लेखात तिथे राहणाऱ्या लोकांच्या आयुर्मानाचे वर्णन केले होते. लेखानुसार, तिथे राहणारे लोक शून्यापेक्षा कमी तापमानातही बर्फाच्या थंड पाण्याने आंघोळ करतात. यामुळे त्यांची त्वचा टाईट आणि तरुण दिसते.

कमी खाणे आणि जास्त चालणे

लेखात असेही नमूद करण्यात आले होते की काश्मीरमधील लोक कमी खातात आणि जास्त चालतात. ही जीवनशैली त्यांना सुंदर आणि निरोगी बनवते. डॉक्टरांचा असाही विश्वास आहे की जीवनशैली हे दीर्घायुष्य आणि सौंदर्याचे रहस्य आहे. हे लोक सकाळी लवकर उठतात आणि खूप चालतात.

केशर त्वचेवर चमक आणते

काश्मीरमध्ये केशर खूप चांगले पिकवले जाते. काश्मिरी महिला सौंदर्य उत्पादन म्हणून केशर वापरतात. केशरमध्ये चंदन पावडर आणि दूध मिसळून चेहऱ्यावर लावतात. यामुळे त्यांच्या त्वचेला एक वेगळीच चमक येते.

केसांना अक्रोडाचे तेल लावा.

काश्मीरमध्ये अक्रोडाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यात ओमेगा-9, ओमेगा-6, ओमेगा-3 इत्यादी घटक आढळतात. ते आरोग्यासाठी चांगले असण्यासोबतच त्वचा सुंदर बनवतात महिला ते फक्त खातच नाहीत तर केसांना देखील अक्रोडाचे तेल लावतात.

दूध आणि बदाम घालून स्क्रब करा

काश्मिरी महिलांच्या सौंदर्याचे रहस्य दूध आणि बदामात लपलेले आहे. तिथल्या महिला रात्री बदाम पाण्यात भिजवतात. सकाळी ते बारीक करून दुधात मिसळून पेस्ट बनवतात. याने त्या त्यांचा चेहरा साफ करतात. अशा काही नैसर्गिक गोष्टींमुळे त्यांचे सौंदर्य आजही टिकून आहे.