
Chakana with Alcohol: बार अथवा रेस्टॉरंटमध्ये दारुसोबत खारे शेंगदाणे, मटकी, फ्राय पापड अथवा इतर कुरकुरीत पदार्थ देण्यात येतात. दारुसोबत अनेक ट्रेंड सुरू झाले. त्यातील काही काळाच्या पडद्याआड मागे पडतात. तर काही ट्रेंड अद्यापही मद्यपींचे आवडते आहेत. त्यात खारे शेगदाण्याची मागणी काही घटलेली नाही. वाईन तज्ज्ञ सोनल हॉलँड यांच्या मते, हा चकन्याचा हा प्रयोग कधीच फसला नाही. त्याची मागणी कधीच घटली नाही. उलट दारु पिताना अनेक जण हा चकना आवर्जून मागवतात. त्यामागील कारणं आणि तर्क वेगळा आहे. त्यामुळे रेस्टॉरंट आणि बारची कमाई कित्येक पटीने वाढते. तर त्यामागे इतरही अनेक कारणं आहेत. काय आहे त्यामागील आर्थिक गणित?
1- तहान वाढते त्यामुळे ग्राहक जास्त दारू पितात
खाऱ्या शेंगदाण्यामुळे तहान अधिक वाढते. ग्राहक तहान लागल्यावर पाणी कमी आणि दारू अधिक पितात. ते दारू आणि पाण्याची बॉटल अधिक वेळा मागवतात. कमाईमागे हे एक सीक्रेट गणित दडलेले आहे. जशजशी तहान वाढते, तसतशी दारूची मागणी वाढते. बिअर मालकाचा व्यवसाय वाढतो.
2- कुरकुरीत चव जिभेवर रेंगाळते, गप्पांना येते उधाण
वाईन तज्ज्ञ सोनल हॉलँड यांच्या मते, खऱ्या शेंगदाणे कुरकुरीत असतात. त्यांची खास चव जिभेवर रेंगाळते. त्यातच मग दारुचा अंमल वाढतो आणि चर्चांना, गप्पांना उधाण येते. मग चकना अधिक वेळा मागितला जातो. पेग मागे पेग रिचवल्या जातात आणि हेच या व्यवसायाचं खरं सूत्र मानल्या जातं.
3-मद्याचा अंमल चढत नाही
खारे शेंगदाणे हे प्रोटीनचे माध्यम होते. शेंगदाणे आणि पाण्यामुळे दारूचा अंमल एका काळापर्यंतच टिकतो. मग पुन्हा मद्य मागवले जाते. हँगओव्हर होऊ नये यासाठी अनेक बिअरबार अथवा रेस्टॉरंट चकना आवर्जून अगोदर देतात. तर काही ठिकाणी हे मोफत देण्यात येते. त्यामुळे दारूची मागणी वाढते.
4- स्वस्त आणि तयार करायला सोपं
बार अथवा रेस्टॉरंटमध्ये चकना तयार करणे सोपे काम आहे. या वस्तू ही अत्यंत महाग मिळत नाही. त्यात मटकी फ्राय, शेंगदाणे उकड, फ्राय मसाला पापड अथवा इतर पदार्थ तयार करण्यासाठी फार कमी कालावधी लागतो. विशेष म्हणजे त्यासाठी फार मोठी रक्कमही खर्च करावी लागत नाही. काही जण सॅलडची पण मागणी करतात.
5- भूख खवळते
खारे शेंगदाणे हे भूक वाढवतात. काही जण मर्यादीत मद्यपान करून भरपेट जेवणावर भर देतात. विविध पदार्थांवर ताव मारतात. त्यामुळे रेस्टॉरंटचा चांगला व्यवसाय होतो. हे एक अर्थकारण आहे. चकना, दारू आणि जेवण यावर बार, रेस्टॉरंटचा चांगला व्यवसाय होतो आणि त्यांची मोठी कमाई होते.