घराच्या छतावर Solar Panel बसवा, मोफत वीज मिळवा! जाणून घ्या किती खर्च येईल?

| Updated on: Sep 14, 2021 | 12:22 AM

तुमच्या घराचे वीज बिल किती येतं? 800-1000 रुपये किंवा 1500-2000 रुपये किंवा त्याहून अधिक येत असेल. त्यामुळे दरवर्षी 15 ते 20 हजारांचा खर्च वीजेवर केला जातो. या खर्चापासून मुक्ती हवी आहे का?

1 / 5
Solar Panel Rooftop Cost: तुमच्या घराचे वीज बिल किती येतं? 800-1000 रुपये किंवा 1500-2000 रुपये किंवा त्याहून अधिक येत असेल. त्यामुळे दरवर्षी 15 ते 20 हजारांचा खर्च वीजेवर केला जातो. या खर्चापासून मुक्ती हवी आहे का? होय, असं करता येऊ शकतं. घराच्या छतावर जर सोलर पॅनेल बसवले तर वीजबिलाच्या खर्चापासून सुट्टी मिळू शकते. विशेष म्हणजे तुम्ही स्वतःच्या खर्चाने आणि सरकारच्या मदतीने सोलर पॅनेल घराच्या छतावर लवू शकता.

2 / 5
वास्तविक, केंद्र सरकारला 2022 पर्यंत देशातील हरित ऊर्जेचे उत्पादन 175 GW पर्यंत नेण्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत सरकार तुम्हाला सोलर पॅनेल बसवण्यासाठी मदत करत आहे. तुम्ही सौर पॅनेल कुठेही बसवू शकता, फक्त पुरेसा सूर्यप्रकाश तेथे आला पाहिजे. आपल्या घराचे छप्पर यासाठी योग्य ठिकाण आहे. तुम्ही सौर पॅनेल लावून वीजनिर्मिती करू शकता आणि तुमच्या गरजेपेक्षा जास्त वीजनिर्मिती होत असल्यास तुम्ही ती वीज सरकारला विकू शकता.

3 / 5
घराच्या छतावर Solar Panel बसवा, मोफत वीज मिळवा! जाणून घ्या किती खर्च येईल?

4 / 5
तज्नांनुसार, सोलर पॅनेलचं आयुष्य हे 25 वर्ष इतकं असतं. या सोलर पॅनेलचा मेंटेनन्सचा खर्चही परवडणारा असतो. फक्त 10 वर्षात एकदा सोलरची बॅटरी बदलावी लागते. यासाठी 20 हजार रुपयांचा खर्च येतो. सोलरपासून निर्माण होणारी वीज मोफतच मिळेल. सोबतच उर्वरित वीज ही तुम्ही सरकारला किंवा खासगी कंपनीला विकू शकता. यासाठी तुम्हाला आरएडीएशी (RADA) संपर्क करावा लागेल.  प्रत्येक राज्याच्या राजधानीत तसेच प्रमुख शहरात त्यांची कार्यालयं आहेत.

5 / 5
केंद्र सरकारसह अन्य काही राज्य सरकारकडून यासाठी अनुदान दिलं जातं. यानंतरही तुमच्याकडे सोलरसाठी लागणारी रक्कम नसेल, तर कर्ज घेता येतं. तुम्ही 2 किलोवॅटचा सोलर पॅनल लावला, तर 10 तासात 10 यूनिट वीजनिर्मिती होते. म्हणजेच 1 महिन्यात 300 यूनिट वीज. तुम्हाला दरमहा 100 यूनिट वीज लागत असेल, तर तुम्ही उर्वरित 200 यूनिट विकून पैसे कमावू शकता.