WhatsApp अकाऊंट धाडकण होणार बंद, 5 चुका केल्यास चांगलंच महागात पडणार!

आजकाल अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असले तरीही तुम्ही काही चुका केल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते तात्पुरते बंद होऊ शकते किंवा ते थेट बंद केले जाऊ शकते. या चुका कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या...

WhatsApp अकाऊंट धाडकण होणार बंद, 5 चुका केल्यास चांगलंच महागात पडणार!
whatsapp ban
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 04, 2026 | 3:31 PM

Whatsapp Ban : आज फक्त भारतच नव्हे तर जगभरात व्हॉट्सअ‍ॅप मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मेसेजिंग, व्हिडीओ कॉलिंग, डॉक्यूमेंट शेअरिंग तसेच अन्य महत्त्वाच्या कामांसाठी आज व्हॉट्सअ‍ॅप हे एक विश्वासर्ह माध्यम मानले जाते. व्हॉट्सअ‍ॅप नसेल तर रोजची कामंदेखील आज अशक्य होऊन बसली आहेत. दरम्यान, आजकाल अनेकजण व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करत असले तरीही तुम्ही काही चुका केल्यास तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते तात्पुरते बंद होऊ शकते किंवा ते थेट बंद केले जाऊ शकते. या चुका कोणत्या आहेत, ते जाणून घेऊ या…

थर्ड पार्ट अ‍ॅप वापरणं धोक्याचं

अनेक युजर्स व्हॉट्सअ‍ॅप वापरण्यासाठी GB WhatsApp, WhatsApp Plus अशा थर्ड पार्टी अ‍ॅपचा वापर करतात. खरं म्हणजे GB WhatsApp, WhatsApp Plus हे व्हॉट्सअ‍ॅपचे अधिकृत व्हर्जन नाही. मेटा कंपनीकडून असे कोणतेही थर्ड पार्ट अ‍ॅप वापरण्यास परवानगी नाही. त्यामुळे तुम्ही वरील थर्ड पार्टी अ‍ॅप वापरत असाल तर तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. ही बंदी तात्पुरती किंवा कायमस्वरुपी असू शकते. व्हॉट्सअ‍ॅपचे अधिकृत अ‍ॅप हे Google Play Store किंवा Apple App Store वरूनच डाऊनलोड करावे, असे सांगितले जाते.

भरपूर साऱ्या लोकांना मेसेज पाठवणे

तुम्ही कमी वेळेत भरपूर साऱ्या लोकांना बल्कमध्ये मेसेज पाठवत असाल तर व्हॉट्सअ‍ॅप त्याला स्पॅम प्रॅक्टिस गृहित धरते. यामुळे तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बॅन होऊ शकते.

खोटी बातमी खरी सांगत शेअर करणे

व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक मेसेज रोज फॉरवर्ड केले जातात. या मेसेजमध्ये काही बातम्यांचा समावेश असतो. यातील काही बातम्या या खोट्या असतात. अशाच खोट्या बातम्या तुम्ही खऱ्या समजून फॉरवर्ड करत असाल तर तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद केले जाऊ शकते. चुकीची माहिती पसरवल्यामुळे तुमच्यावर ही कारवाई केली जाऊ शकते.

तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह कंटेंट शेअर करत असाल तरीदेखील तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. कायदेशीर दृष्ट्या बंदी असलेली माहिती शेअर केल्यावरही तुमचे व्हॉट्सअ‍ॅप खाते बंद केले जाऊ शकते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us