चंद्रपुरात भीषण अपघात; १० मजूर ठार; चिमुकला बचावला

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेले सर्व मजूर आहेत. विशेष म्हणजे या भीषण अपघातात एक वर्षाचा चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा […]

चंद्रपुरात भीषण अपघात; १० मजूर ठार; चिमुकला बचावला
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात शनिवारी रात्री एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे. या अपघातात मृत्यू झालेले सर्व मजूर आहेत. विशेष म्हणजे या भीषण अपघातात एक वर्षाचा चिमुकला आश्चर्यकारकरित्या बचावला आहे. या अपघातात मृत्यू पावलेल्यांमध्ये सात महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलीचा समावेश आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्यांना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मजुरांच्या टाटा मॅजिक वाहनाला ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडून आला.

हे सर्व मजूर कोरपना येथील विदर्भ जिनिंगमध्ये कामासाठी आले होते. मात्र काम न मिळाल्यामुळे ते शनिवारी रात्री गावी परत जाण्यासाठी निघाले. मात्र कोरपना-वणी मार्गावर हेटी या गावाजवळ विरुध्द दिशेने येणाऱ्या ट्रक ने त्यांच्या टाटा मॅजिक गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यात टाटा मॅजिक गाडीचा चक्काचूर झाला. कोपरना-वणी मार्गावर हेटी गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात मृत पावलेल्या लोकांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.