10 मिनिटात 40 टक्के चार्जिंग, ओप्पोचा नवीन फोन लाँच

| Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM

मुंबई : स्मार्टफोन युजर्सला नेहमीच एका समस्येला सामोरं जावं लागतं. ती समस्या म्हणजे लवकर बॅटरी लो होणे. जगभरात 270 कोटी लोक स्मार्टफोनचा वापर करतात. अनेकदा तर बॅटरी लवकर चार्ज होत नाही आणि चार्ज झाल्यास बॅटरी लवकर उतरते. बॅटरी लवकर उतरते म्हणून त्रस्त झालेल्या लोकांसाठी ‘ओप्पो’(Oppo) लवकरच भारतात नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. ‘Oppo R17 Pro’ […]

10 मिनिटात 40 टक्के चार्जिंग, ओप्पोचा नवीन फोन लाँच
Follow us on

मुंबई : स्मार्टफोन युजर्सला नेहमीच एका समस्येला सामोरं जावं लागतं. ती समस्या म्हणजे लवकर बॅटरी लो होणे. जगभरात 270 कोटी लोक स्मार्टफोनचा वापर करतात. अनेकदा तर बॅटरी लवकर चार्ज होत नाही आणि चार्ज झाल्यास बॅटरी लवकर उतरते. बॅटरी लवकर उतरते म्हणून त्रस्त झालेल्या लोकांसाठी ‘ओप्पो’(Oppo) लवकरच भारतात नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. ‘Oppo R17 Pro’ असं या स्मार्टफोनचं नाव आहे. या स्मार्टफोनचं वैशिष्ट्य म्हणजे केवळ 10 मिनिटात तब्बल 40 टक्के चार्जिंग होणार आहे. ओप्पोने अद्याप या स्मार्टफोनची किंमतीची जाहीर केली नाही. भारताआधी चीनमध्ये हा स्मार्टफोन लाँच झाला असून त्याची चीनमध्ये किंमत 3999 सीएनवाई म्हणजेच जवळपास 40 हजार रुपये इतकी आहे.
‘Oppo R17 Pro’ मध्ये 6.4 इंचाचा AMOLED डिस्प्ले (2340 X 1080  पिक्सेल रिझॉल्युशन) देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आहे. तर या स्मार्टफोनमध्ये 8 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असणार आहे.
ओप्पोने ‘Oppo R17 Pro’मध्ये अँड्राईड 8.1 व्हर्जनचा उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. या स्मार्टफोनमध्ये 12 आणि 20 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आहे. तर 25 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.
या स्मार्टफोनचं सर्वात आकर्षक वैशिष्ट्य म्हणजे कमी वेळात चार्ज होणारी बॅटरी होय. स्मार्टफोनमध्ये 3650 mAh क्षमतेची बॅटरी असून यात VOOC चार्जिंग दिली गेली आहे. यामुळे स्मार्टफोन 10 मिनिटात 40 टक्के इतक्या झपाट्याने चार्जिंग होते.
Oppo R17 Pro स्मार्टफोनची वैशिष्ट्ये :

  • 4 इंच, Oppo R17 Pro
  • 8 GB रॅम
  • 128 GB इंटरनल स्टोरेज
  • 1 अॅंड्रॉईड सिस्टीम
  • 12 + 20 रिअर कॅमेरा
  • 25 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
  • बॅटरी क्षमता 3650mAh
  • स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर