तब्बल 1023 तब्लिगींना कोरोना, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर

देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तबलिगी जमातीशी संबंधित (Tablighi jamaat corona case) आहेत.

तब्बल 1023 तब्लिगींना कोरोना, देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 2902 वर
| Edited By: | Updated on: Apr 04, 2020 | 7:26 PM

नवी दिल्ली : देशात एकूण कोरोनाग्रस्तांपैकी 30 टक्के लोक तब्लिगी जमातीशी संबंधित (Tablighi jamaat corona case) आहेत. देशातील 17 राज्यात 1023 तब्लिगी जमातीशी संबंधित असलेल्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली (Tablighi jamaat corona case) आहे.

याशिवाय तब्लिगी जमातीमधील एकूण 23 हजार लोकांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली. देशातील एकूण कोरोना रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण तब्लिगी जमातीमधील असल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.


देशातील 9 टक्के कोरोना रुग्ण हे 0-20 वयोगटातील आहेत. 33 टक्के रुग्ण हे 40-60 वयोगटातील आहेत. 17 टक्के रुग्ण हे 60 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातले आहेत आणि सर्वाधिक 42 टक्के रुग्ण हे 21 ते 40 वयोगटातील आहे, अशी माहितीही आरोग्य मंत्रालयाने दिली.

दरम्यान, देशात आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या ही 2902 पर्यंत पोहोचली आहे. कालपासून ते आतापर्यंत 601 कोरोना रुग्ण देशात आढळले आहेत. तसेच आतापर्यंत कोरोनामुळे 68 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 183 लोक कोरोनामुक्त झाले आहेत.