बुलडाण्यात गतिमंद मुलीवर अत्याचार

गणेश सोळंकी, टीव्ही ९ मराठी, बुलडाणा : अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खामगांव तालुक्यातील हिंगणा कारेगांव येथे घडली आहे. या नराधमाने अल्पवयीन गतिमंद मुलीला चॉकलेटचं अमिष दाखवत, तिला गावालगत असलेल्या नाल्याजवळ नेत तिच्यावर अत्याचार केला. संतोष जाधव या संशयित आरोपीचं नाव आहे. मात्र, त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे पीडितेला जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर रूग्णालयात […]

बुलडाण्यात गतिमंद मुलीवर अत्याचार
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:58 PM

गणेश सोळंकी, टीव्ही ९ मराठी, बुलडाणा : अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खामगांव तालुक्यातील हिंगणा कारेगांव येथे घडली आहे. या नराधमाने अल्पवयीन गतिमंद मुलीला चॉकलेटचं अमिष दाखवत, तिला गावालगत असलेल्या नाल्याजवळ नेत तिच्यावर अत्याचार केला. संतोष जाधव या संशयित आरोपीचं नाव आहे.

मात्र, त्याहीपेक्षा धक्कादायक बाब म्हणजे पीडितेला जवळच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर रूग्णालयात महिला डॉक्टर उपलब्ध नसल्याने पीड़ित मुलीला तीन तास उपचार मिळाले नाही.  रूग्णालयाचा या भोंगळ कारभामुळे रुग्णालय परिसरात काही काळ गोंधळ निर्माण झाला.

हिंगणा कारेगांव इथं राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन गतिमंद मुलगी ही गावात फिरत असताना गावातील संतोष जाधव या नराधमाने पीडित मुलीला चॉकलेट देण्याचे अमिष दाखवत तिला गावा जवळ असलेल्या नाल्यावर घेऊन गेला आणि तिच्यावर अत्यचार केले. ही सर्व माहिती पीडितेने घरी आल्यावर कुटुंबीयांना दिली.

या घटनेनंतर मुलीच्या कुटुंबीयांनी घटनेची तक्रार खामगांव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. त्यांनतर पोलिसांनी याची नोंद घेत, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत संतोष जाधव या आरोपीला तात्काळ अटक केल आहे. तरी पोलीस अधिक तपास करत आहेत.