माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ते माजी मुख्यमंत्री, दिग्गजांचा पराभव

| Updated on: May 24, 2019 | 11:48 PM

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल खूपच रंजक होते. जिंकणाऱ्याच्या चारही बाजूने चर्चा सुरु होत्या. पण यावेळी काही दिग्गज मंडळीही आपला जलवा दाखवण्यात अयशस्वी ठरले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 70 पेक्षा अधिक राजकारणी कुटुंबातील सदस्य मैदानात उतरले होते. यामध्ये माजी 21 मुख्यमंत्री, 15 माजी मुख्यमंत्र्यांची मुलं आणि 6 माजी मुख्यमंत्र्यांच्या मुली या निवडणुकीत उभ्या […]

माजी पंतप्रधान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ते माजी मुख्यमंत्री, दिग्गजांचा पराभव
Follow us on

मुंबई : यंदाच्या लोकसभा निवडणुकांचे निकाल खूपच रंजक होते. जिंकणाऱ्याच्या चारही बाजूने चर्चा सुरु होत्या. पण यावेळी काही दिग्गज मंडळीही आपला जलवा दाखवण्यात अयशस्वी ठरले आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये 70 पेक्षा अधिक राजकारणी कुटुंबातील सदस्य मैदानात उतरले होते. यामध्ये माजी 21 मुख्यमंत्री, 15 माजी मुख्यमंत्र्यांची मुलं आणि 6 माजी मुख्यमंत्र्यांच्या मुली या निवडणुकीत उभ्या होत्या. यामध्ये केवळ 6 माजी मुख्यमंत्री, 8 माजी मुख्यमंत्र्यांची मुलं आणि 2 माजी मुख्यमंत्र्यांच्या मुली विजयी झाल्या आहेत.

दरम्यान, पराभूत झालेल्या माजी मुख्यमंत्र्यांपैकी सर्वाधिक मुख्यमंत्री हे काँग्रेस पक्षाचे होते. पक्षाने यावेळी 9 माजी मुख्यमंत्र्यांना तिकिट दिलं होते. यामध्ये कोणालाही जिंकता आलं नाही.

पराभूत झालेले सर्वाधिक मुख्यमंत्री काँग्रेसचे

दिग्विजय सिंह, शीला दीक्षित आणि भुपेंद्र सिंह हुड्डासारखे दिग्गज यावेळी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले आहेत. पराभूत झालेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये सर्वाधिक हे काँग्रेसचे मुख्यमंत्री आहेत. यामध्ये माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (भोपाळ, मध्य प्रदेश), शीला दीक्षित (दिल्ली),  भूपेंद्र सिंह हुड्डा (सोनीपत, हरयाणा), हरीश रावत (नैनीताल, उत्तराखंड), अशोक चव्हाण (नांदेड, महाराष्ट्र), सुशील कुमार शिंदे (सोलापूर, महाराष्ट्र), मुकुल संगमा (तुरा, मेघालय), नवाम टुकी (अरुणाचल प्रदेश), वीरप्पा मोईली (चिकबल्लूर, कर्नाटक) यांचा समावेश आहे.

तसेच काही बिगर काँग्रेसी मुख्यमंत्र्यांचाही यामध्ये पराभव झाला आहे. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती अनंतनाग मतदारसंघातून पराभूत झाल्या आहेत. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी देवगौडा टुम्कुर आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांचाही यंदाच्या लोकसभेत पराभव झालेला आहे.

निवडणुकीत माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांचा पराभव

यंदा लोकसभा निवडणुकीत माजी मंत्र्यांचे 15 मुलं आणि 6 मुली निवडणूक मैदानात उतरल्या होत्या. यामध्ये केवळ माजी मुख्यमंत्र्यांच्या 9 मुलांना विजयी होण्यात यश मिळालं आहे. यामध्ये सुखबीर सिंह बादल, नकुलनाथ, राजवीर सिंह, अखिलेश यादव, अनुराग ठाकूर, दुष्यंत सिंह, बी वाई राघवेंद्र आणि गौरव गोगोई यांचा विजय झाला आहे. तर माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलींमध्ये रीता बहुगुणा आणि कनिमोझी यांचा विजय झालेला आहे.

पराभूत झालेल्यांमध्ये मीसा भारती, अंजली सोरेन झामुमो आणि कविता निजामाबाद यांचा समावेश आहे.