मुलाकडून वडिलांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या

वडील आणि मुलाच्या भांडणामध्ये मुलाने थेट वडिलांवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या (Son murder father in sangli) केली.

मुलाकडून वडिलांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
| Edited By: | Updated on: Feb 05, 2020 | 9:47 AM

सांगली : वडील आणि मुलाच्या भांडणामध्ये मुलाने थेट वडिलांवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या (Son murder father in sangli) केली. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना सांगलीमधील भीलवडी पोलीस हद्दीतील अंकलखोप गावात घडली. प्रकाश महादेव वारे (52) असं मृताचे (Son murder father in sangli) नाव आहे.

मृत प्रकाश वारे शेतमजुरी करतात. त्यांना दोन मुलं आहेत. त्यांच्या पत्नीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले होते. ते मुलांसोबत राहत होते. त्यांची सून बाळंतपणासाठी माहेरी गेली आहे. नेहमीप्रमाणे आज दोघांमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्यानंतर किशोरने वडीलांच्या छातीवर डाव्याबाजूस धारदार शस्त्राने वार केले. वार खोलवर झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर संशयीत मुलगा किशोर वारे (21) पसार झाला आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून संशयीत आरोपीचा शोध घेत आहेत.

सांगलीतील भीलवडी पोलीस ठाण्यात तीन दिवसात दुसरा खून झाल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली आहे. बापलेकांमध्ये वारंवार भांडणे होत असल्याने शेजाऱ्यांनी ते सोडविण्याचा प्रयत्न केला नाही.