बॅटऱ्या बिघडल्या, टायर खराब; नागपुरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत

नागपूर शहरातील बससेवा साडेचार महिन्यांपासून बंद आहेत (Nagpur Bus service)

बॅटऱ्या बिघडल्या, टायर खराब; नागपुरातील अनेक बस भंगारात जाण्याच्या स्थितीत
सचिन पाटील

| Edited By:

Aug 27, 2020 | 8:29 AM

नागपूर : नागपूर शहरातील बससेवा साडेचार महिन्यांपासून बंद आहेत (Nagpur Bus service). बसेस बंद असल्यामुळे 50 टक्के बसेसचे टायर खराब झाले आहेत. बसेस बंद असल्याने शेकडो बसेसच्या बॅटऱ्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे मोठं नुकसान बसेसचे झालं आहे. शहरातील अनेक स्टार बसेस भंगारात जाण्याच्या स्थितीत आहेत (Nagpur Bus service).

साडेचार महिन्यांपासून बसेस एकाच ठिकाणी उभ्या असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. कोरोनाच्या संक्रमणाच्या भीतीने स्टार बससेवा बंद आहे. लॉकडाऊनचा मोठा फटका नागपुरातील बस सेवेला बसला आहे.

लॉकडाऊनमुळे बसेसचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पुणे महानगर परिवहन मंडळावरही आर्थिक संकट आले आहे. लॉकडाऊनमुळे पीएमपीएमएल बस सेवेला 100 कोटींचे नुकसान झाले आहे. पीएमपीएमएलची सेवा सलग 67 दिवस बंद होती. त्यामुळे हे नकुसान झाले आहे.

पीएमपीएमएलचे दररोजचे सरासरी उत्पन्न एक कोटी 60 लाखांपर्यंत होते. तर दरमहा 45 ते 50 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. पण 17 मार्चपासून पीएमपीएमएल सेवा बंद असल्यामुळे पीएमपीएमएल विभागाला लॉकडाऊनचा मोठा फटका बसला आहे. सध्या अत्यावश्यक सेवेतील फक्त 100 बसेस सुरु आहेत.

पुणे, पिंपरीत 3 सप्टेंबरपासून बससेवा सुरु होणार असल्याचे माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ य़ांनी दिली. बसे सेवा सुरु होणार असल्याने नागरिकांना प्रवासासाठी दिलासा मिळणार आहे.

नुकतेच वंचित बहुजन आघाडीकडून राज्यभरात डफली बजाव आंदोलन करण्यात आले. राज्यातील बसेस सुरु कराव्यात तसेच लॉकडाऊन उठवण्याबाबत हे आंदोलन करण्यात आले होते.

संबंधित बातम्या : 

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला, कोल्हापूर-कर्नाटक बस सेवा बंद

Lockdown : 67 दिवस PMPML बस सेवा बंद असल्याने 100 कोटींचे नुकसान

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें