AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहाट ठरली अखेरची! मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 तरुणांना वाहनाची धडक, जागीच मृत्यू

पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहाट ठरली अखेरची! मॉर्निंग वॉकला गेलेल्या 2 तरुणांना वाहनाची धडक, जागीच मृत्यू
| Edited By: | Updated on: Oct 09, 2020 | 8:59 AM
Share

चंद्रपूर : कोरोनासारख्या जीवघेण्या संसर्गाला रोखण्यासाठी राज्यात लॉकडाऊन असलं तरी या दरम्यान, अपघाताच्या अनेक धक्कादायक घटना समोर आल्या. चंद्रपूरमध्येही असाच भयंकर अपघात झाला आहे. पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांना पाचारण करण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. (accident news two youth died in car accident chandrapur news)

मिळालेल्या माहितीनुसार, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन तरुणांना अज्ञात वाहनांनी धडक दिली. या भीषण धडकेमध्ये दोन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यातील आरमोरी मुख्य महामार्गावरील ही घटना आहे. अपघात झाल्याचं स्थानिकांच्या लक्षात येताच तरुणांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण तिथे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

प्रशांत सहारे (22) आणि रोहित चट्टे (22) अशी मृत तरुणांची नावं आहेत. हे दोघेही खरकाडा येथील रहिवासी आहेत. कोरोनाच्या काळात घराबाहेर न पडता आल्याने सध्या दोघे रोज मॉर्निंग वॉकला जायचे. पण आजचा मॉर्निंग वॉक प्रशांत आणि रोहितसाठी अखेरचा ठरला आहे. त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण सहारे आणि चट्टे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

प्रशांत आणि रोहित दोघेही रस्त्याच्या कडेने धावत असताना एका अज्ञात वाहनाने दोघांना जोरदार धडक दिली आणि त्यानंतर वाहनचालक पळून गेल्याची प्राथमिक माहिती हाती लागत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून त्यांनी प्रशांत आणि रोहितचा मृतदेह ताब्यात तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती कुटुंबियांनाच कळताच त्यांना मोठा धक्का बसला आहे. अगदी तरुण वयात असा अकाली मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

इतर बातम्या – 

उदयनराजेंबाबतचं आंबेडकरांचं ‘ते’ वक्तव्य पटलं नाही; संभाजीराजेंची नाराजी

2 लाख विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा, परीक्षेला बसू न शकणाऱ्यांना पुन्हा संधी देऊ: मुंबई विद्यापीठ

(accident news two youth died in car accident chandrapur news)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.