शाहरुख आणि सलमानलाही मागे टाकलं, गुगल सर्चमध्ये सनी लिओनी अव्वल

अभिनेत्री सनी लिओनीने (Suny leone) पुन्हा एकदा कमाल केली आहे. ऑगस्ट 2019 च्या गुगल सर्च सर्व्हेमध्ये सनी लिओनी अव्वल ठरली आहे.

शाहरुख आणि सलमानलाही मागे टाकलं, गुगल सर्चमध्ये सनी लिओनी अव्वल
लाखो रुपये अॅडव्हान्स घेऊन सनी लिओनीची कार्यक्रमाला दांडी
| Edited By: | Updated on: Aug 13, 2019 | 4:46 PM

मुंबई : अभिनेत्री सनी लिओनीने (Sunny leone) पुन्हा एकदा कमाल केली आहे. ऑगस्ट 2019 च्या गुगल सर्च सर्व्हेमध्ये सनी लिओनी अव्वल ठरली आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खानलाही (Shahrukh Khan) मागे टाकले आहे. सनी लिओनी या सर्वांच्या तुलनेत गुगल सर्चमध्ये पुढे आहे. गुगल ट्रेन्ड अॅनालिटिक्सनुसार सनी लिओनी आणि तिच्या व्हिडीओ सर्वाधिक गुगलवर सर्च केल्या जातात.

सनी लिओनीला मणिपूर आणि आसाम राज्यात सर्वाधिक सर्च केलं आहे. गुगल सर्चमध्ये सनी लिओनी अव्वल ठरल्यामुळे तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग असल्याचं सिद्ध झालं आहे. तिने बॉलिवूमडमधील मोठे स्टार सलमान आणि शाहरुख खानलाही यंदाच्या ऑगस्ट 2019 गुगल सर्च सर्व्हेमध्ये मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला आहे.

“मी माझ्या सर्व चाहत्यांचे खूप आभार व्यक्त करते. नेहमी ते मला साथ देतात त्यामुळे मला खूप छान वाटते”, असं सनी लिओनी म्हणाली.

विशेष म्हणजे गेल्यावर्षीही सनी लिओनीने गुगल सर्चमध्ये पहिले स्थान मिळवले होते. सनी लिओन पूर्वी अडल्ट चित्रपटात काम करत होती. यानंतर तिने भारतीय चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने सलमान खानचा शो बिग बॉसमधून बॉलिवूडमध्ये एण्ट्री केली. तिने आतापर्यंत अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहे.

सनी लिओनीला एकूण तीन मुलं आहे. विशेष म्हणजे त्यातील एक तिने दत्तक घेतले आहे, तर बाकी दोघं ही सरोगेसीद्वारे झाली आहेत. नुकतेच दोन लहान मुलांना दत्तक घेतले आहे. याशिवाय तिच्या जीवनावर आधारित एक चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटालाही प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिला.