Neha Mahajan | मराठी अभिनेत्रीच्या सितारवादनाचा सातासमुद्रापार डंका, नेहा महाजन-रिकी मार्टीनच्या म्युझिक अल्बमला ‘ग्रॅमी’ नॉमिनेशन!

| Updated on: Dec 07, 2020 | 3:32 PM

अभिनेत्री असण्याबरोबरच नेहा उत्तम सितार वादक आहे. तिच्या याच कलेने तिचा डंका साता समुद्रापार वाजवला आहे.

Neha Mahajan | मराठी अभिनेत्रीच्या सितारवादनाचा सातासमुद्रापार डंका, नेहा महाजन-रिकी मार्टीनच्या म्युझिक अल्बमला ‘ग्रॅमी’ नॉमिनेशन!
Follow us on

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजन (Neha Mahajan) नेहमीच काहीना काही कारणांनी चर्चेत असते. नुकतेच आणखी एका खास कारणाने नेहा महाजन चर्चेत आली आहे. नेहासाठी हे वर्ष खूप खास ठरले आहे. अभिनेत्री असण्याबरोबरच नेहा उत्तम सितार वादक आहे. तिच्या याच कलेने तिचा डंका साता समुद्रापार वाजवला आहे. नेहा महाजन आणि लॅटीन पॉप किंग रिकी मार्टीन यांच्या ‘Pausa’ या अल्बमला मानाच्या ‘ग्रॅमी’ (Grammy Nomination) पुरस्कारांत नॉमिनेशन मिळाले आहे. रिकीने नेहाकडून त्याच्या या अल्बमसाठी सितारची रेकॉर्ड मागवली होती (Actress Neha Mahajan and Ricky Martin album in Grammy Nomination).

नेहा महाजन आणि रिकी मार्टीन ‘Pausa’ या अल्बमला बेस्ट लॅटीन पॉप विभागामध्ये नॉमिनेशन मिळाले आहे. या अल्बमने लॅटीन ग्रॅमीमध्येही आपले नाव गाजवले आहे. नेहाने तिचे वडील विदुर महाजन यांच्याकडून सितार वादनाचे धडे घेतले आहेत. नेहामुळे भारताच्या शिरपेचातही मानाचा तुरा खोवला गेला आहे. खुद्द नेहाने ही आनंदाची चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अभिनयासोबतच सितारवादनाचे धडे

मागील 13 वर्षांपासून नेहाने अभिनयासोबतच सितार वादनाचे शिक्षण घेणेही सुरु केले होते. ज्यानंतर तिने या कलेवर प्रभुत्वही मिळवले आहे. नेहाच्या सोशल मीडिया पोस्ट पाहता याचा अंदाज येतो. ती नेहमी आपले सितार वादनाचे व्हिडीओ पोस्ट करत असते. तिच्या या व्हिडीओंना रसिकांकडून आणि चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत असतो (Actress Neha Mahajan and Ricky Martin album in Grammy Nomination).

रिकीसोबतच्या या गाण्याची संधी कशी मिळाली, यासंदर्भात माहिती नेहा महाजनने एका मुलाखतीत शेअर केली होती. ती म्हणाली, ‘जानेवारी महिन्यात रिकीकडून या गाण्यासाठीचा फोन मला आला. ज्यामध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करत सितार वादन करशील का, असे मला विचारण्यात आले. मुळात रिकीला मी शाळे असल्यापासून ऐकत होते. त्यात संगीतामध्ये रागसंगीताकडे माझा ओढा जास्त होता. त्यामुळे मी पटकन होकार दिला. त्यामुळे त्याच्या निमित्ताने काहीतरी नवे शिकण्याची संधी मला मिळाली’.

कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याकारणाने नेहाने मुंबईतच तिच्या पद्धतीने या गाण्याच्या गरजेनुसार सितारवादनाची तयारी केली. प्रसन्ना विश्वनाथन या साऊंड रेकॉर्डिस्टच्या मदतीने तिने हे सितार वादन रेकॉर्ड करत ते रिकीपर्यंत पोहोचवले होते.

(Actress Neha Mahajan and Ricky Martin album in Grammy Nomination)