बॉलिवूड अभिनेत्री ‘कोरोना’ग्रस्तांच्या सेवेत, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्युटी

| Updated on: Mar 30, 2020 | 9:15 AM

अभिनेत्री शिखा मल्होत्राने वर्धमान महावीर मेडीकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमधून 2014 मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले, या शिक्षणाचा उपयोग ती 'कोरोना'विरुद्ध लढ्यात करत आहे (Actress Shikha Malhotra serves Corona Patients)

बॉलिवूड अभिनेत्री कोरोनाग्रस्तांच्या सेवेत, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्युटी
Follow us on

मुंबई : देशात ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव पाहता विविध स्तरातून आर्थिक मदतीचा हात येताना दिसत आहे. परंतु बॉलिवूड अभिनेत्री शिखा मल्होत्रा हिने थेट रुग्णसेवेचा पर्याय निवडला आहे. जोगेश्वरीमधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमधील आयसोलेशन वॉर्डमध्ये शिखा ड्युटी करत आहे. (Actress Shikha Malhotra serves Corona Patients)

बॉलिवूड फोटोग्राफर विरल भयानीने इन्स्टाग्राम अकाऊंवर शिखाचं कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे. ‘शिखा मल्होत्रा ही एक अभिनेत्री आहे. शिखाने संजय मिश्रा यांच्यासोबत ‘कांचली’ या समीक्षकांनी गौरवलेल्या चित्रपटात काम केलं आहे. जोगेश्वरीत बीएमसीच्या ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून काम करण्यास शिखाने शुक्रवारी सुरुवात केली आहे. तिने सेवानिवृत्त डॉक्टर आणि नर्सेसनाही ‘कोरोना’विरुद्ध लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे’ असं विरलने लिहिलं आहे.

‘शिखाने वर्धमान महावीर मेडीकल कॉलेज आणि दिल्लीमधील सफदरजंग हॉस्पिटलमधून 2014 मध्ये नर्सिंगचे शिक्षण घेतले. अभिनय क्षेत्रात वळल्यामुळे तिने आजवर नर्सचे काम न केले नाही’ असे पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘बीएमसीने शिखाला नर्स म्हणून काम करण्यास परवानगी दिली आहे. सध्या ती जोगेश्वरी पूर्वमधील हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा हॉस्पिटलमध्ये ड्युटी करत आहे. तिची नियुक्ती आयसोलेशन वॉर्डमध्ये करण्यात आली आहे.

‘नर्सिंगचे शिक्षण घेतल्यानंतर आम्ही समाजसेवेची शपथ घेतली होती. माझ्या मते हीच ती योग्य वेळ आहे’ असं शिखा म्हणाल्याचं विरलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Actress Shikha Malhotra serves Corona Patients)