माझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया

| Updated on: Dec 06, 2019 | 9:23 PM

आमच्या या एन्काऊंटरला विरोध आहे," असे वक्तव्य खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी (Asaduddin Owaisi On Telangana Killing) केले.

माझा एन्काऊंटरला विरोध, हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणावर असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया
Follow us on

नवी दिल्ली : हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवरील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा एन्काऊंटर करण्यात (Asaduddin Owaisi On Hyderabad Encounter) आला. हैदराबाद पोलिसांच्या तावडीतून आरिफ, शिवा, नवीन आणि चिन्ना केशवुलू हे चारही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते जागीच ठार झाले. या एन्काऊंटरचा खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विरोध केला (Asaduddin Owaisi On Hyderabad Encounter) आहे.

“प्रत्येक आरोपीला कायद्यात राहूनच शिक्षा मिळाली पाहिजे, कायदाचे उल्लघंन करुन कोणालाही शिक्षा दिली तर आम्ही त्यांचा विरोध करु, आमच्या या एन्काऊंटरला विरोध आहे,” असे वक्तव्य खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले.

“या एन्काऊंटर सविस्तर चौकशी झाल्यानंतर याबाबत सर्व स्पष्ट होईल. या चारही आरोपींना न्यायलयीन कोठडी सुनवण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी यांना पोलिस कोठडीत घेतले. पहाटे 4.30 च्या दरम्यान या चारही आरोपींचा एन्काऊंटर झाला असे सांगितलं जात आहे. पण मी या सर्व एन्काऊंटरच्या विरोधात आहे.” असेही असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi On Hyderabad Encounter) म्हणाले.

“माझे वैयक्तिक मत आहे की, आपल्याकडे संविधान आहे. कायदा आहे. त्यामुळे त्याचे पालन करणे गरजेचे आहे. जर आपण दहशतवादी अजमल कसाब ज्याने मुंबईत बॉम्बस्फोट केले. त्यावेळी आपण सर्व कायद्यांची अंमलबजावणी केली. तर मग या प्रकरणी का नाही,” असा प्रश्नही ओवेसी यांनी उपस्थित केला.

“आता जी लोक खुश आहेत. सेलिब्रेशन करतात. त्यांना कायदा किंवा संविधान यातील काहीही कळत नाही. त्यांना फक्त निर्णय लवकर घ्यावा असं सर्व लोकांना वाटते. त्यामुळे आपण ही वृत्ती बदलायला हवी,” असेही ओवेसी यावेळी (Asaduddin Owaisi On Hyderabad Encounter) म्हणाले.

हैदराबाद पोलिस चारही आरोपींना 5 डिसेंबरच्या मध्यरात्री साडेतीन वाजता घटनास्थळी घेऊन गेले होते. गुन्ह्याच्या पद्धतीची पुनर्निर्मिती करत असताना चौघांनी पोलिसांच्या हातावर तुरी देत पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी आरोपींवर गोळ्या झाडल्या. गोळीबारात चौघांचाही जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत (Asaduddin Owaisi On Hyderabad Encounter) आहे.

ज्या ठिकाणी गुन्हा घडला, तिथून जवळच हैदराबाद-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर ही चकमक घडली. हैदराबादमधील डॉक्टर तरुणीवर 27 नोव्हेंबरच्या रात्री सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. त्यानंतर चौघांनी तिची हत्या करुन मृतदेह पेटवला होता.