अहमदनगरमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या

| Updated on: Mar 16, 2020 | 7:58 AM

कोपरगावातील शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश गिरे पाटील यांची पाच ते सहा जणांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. Ahmednagar Shivsena Leader Murder

अहमदनगरमध्ये शिवसेना उपतालुका प्रमुखाची गोळ्या झाडून हत्या
Follow us on

शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात शिवसेना पदाधिकाऱ्याच्या हत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सुरेश गिरे पाटील यांची पाच ते सहा जणांच्या टोळीने गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. पूर्ववैमनस्यातून हा धक्कादायक प्रकार घडल्याचा संशय आहे. (Ahmednagar Shivsena Leader Murder)

भोजडे गावातील रहिवासी असलेले सुरेश गिरे काल (रविवार 15 मार्च) घरी होते. संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास बाईक आणि कारमधून पाच ते सहा हल्लेखोर आले. त्यांनी गिरे यांना बेदम मारहाण करुन धारदार शस्त्राने वार केल्याचीही माहिती आहे. त्यानंतर हल्लेखोरांनी सुरेश गिरे यांच्यावर गोळ्या झाडल्या.

गोळीबारात गंभीर जखमी झाल्यामुळे सुरेश गिरे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं होतं.

हेही वाचा : भाडेकरुच्या पत्नीशी समलिंगी संबंध, घरमालकीणीने नवऱ्याला संपवलं

सुरेश गिरे यांच्या हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे, मात्र पूर्ववैमनस्यातून त्यांचा जीव घेतला गेल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर आरोपींना शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहेत. या प्रकरणी अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलला असून पुढील तपास सुरु आहे. (Ahmednagar Shivsena Leader Murder)