Bail Pola Special Photos: नगरच्या पठ्ठ्याची कमाल, लॉकडाऊनमध्ये सागाची बैलगाडी बनवली, किंमत आली तब्बल…
Ahmednagar Bullock cart amid Lockdown Loading... {{{html}}}

त्याने वडील अनिल आणि चुलते भारत थोरात यांच्या मदतीने या बैलगाडीचं काम सुरु केलं. बघता बघता 2 महिन्यात ही बैलगाडी पूर्णत्वास आली आहे.
- लॉकडाऊनच्या काळात अहमदनगर जिल्ह्यात कर्जत शहरातील रणजित अनिल थोरात या तरुणाने सागाच्या लाकडापासून सुंदर अशी बैल गाडी साकारलीये.
- ही बैलगाडी पाहण्यासाठी परिसरातील अनेक लोक हजेरी लावत आहेत. विशेष म्हणजे एक लाख रुपयांपर्यंत किमतीला विकण्याची गाडीला मागणी आली आहे.
- या गाडीवर बारीक कोरीव काम करण्यात आलंय. तसेच बैलांसह या गाडीवर एका शेतकऱ्याची प्रतिमा साकारण्यात आलीये. या बैलगाडीची लांबी 3 फूट, तर रुंद 2 फूट असून उंची 20 इंच आहे.
- रणजित हा नगरच्या चिंतामणी आर्ट गॅलरीमध्ये गेल्या 4 वर्षांपासून काम करतोय. मात्र कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे.
- या काळात रणजीतचे देखील काम बंद पडले. त्यामुळे याकाळात नेमके काय करायचे असा प्रश्न त्याच्या समोर उभा राहिला. त्यातून त्याला बैल गाडीची कल्पना सुचली.
- त्याने वडील अनिल आणि चुलते भारत थोरात यांच्या मदतीने या बैलगाडीचं काम सुरु केलं. बघता बघता 2 महिन्यात ही बैलगाडी पूर्णत्वास आली आहे.
- बैलगाडी आणि त्यावर गाडी चालवणारा शेतकरी अशी ही संपूर्ण हस्तकला पाहून अनेकांनी या गाडीला मागणी केलीय. या गाडीसाठी त्याला 30 हजार रुपये खर्च आला.
- बैलगाडी सोबत त्याने घोडा, हत्ती आणि कासवाची लाकडी मूर्ती देखील तयार केलीय.
- या इतर वस्तूंना देखील चांगली मागणी आहे.
Ahmednagar Bullock cart amid Lockdown
Loading...
{{{html}}}
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us