तळ उद्ध्वस्त करणं आमचं काम, मृतांचा आकडा सरकार सांगेल : वायूदल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:21 PM

नवी दिल्ली: दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणं हे आमचं काम आहे. दहशतवाद्यांचे मृतदेह मोजणं हे आमचं काम नाही, ते सरकार सांगेल, असं म्हणत वायूदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांनी एअर स्ट्राईकमधील मृतांचा आकडा सांगता येणार नाही असं स्पष्ट केलं. याशिवाय विंग कमांडर अभिनंदन हे फिट झाल्यानंतर पुन्हा तातडीने वायूदला रुजू होतील, असं त्यांनी […]

तळ उद्ध्वस्त करणं आमचं काम, मृतांचा आकडा सरकार सांगेल : वायूदल
Follow us on

नवी दिल्ली: दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणं हे आमचं काम आहे. दहशतवाद्यांचे मृतदेह मोजणं हे आमचं काम नाही, ते सरकार सांगेल, असं म्हणत वायूदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी एस धनोआ यांनी एअर स्ट्राईकमधील मृतांचा आकडा सांगता येणार नाही असं स्पष्ट केलं. याशिवाय विंग कमांडर अभिनंदन हे फिट झाल्यानंतर पुन्हा तातडीने वायूदला रुजू होतील, असं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर बहुप्रतीक्षीत राफेल विमानं येत्या सप्टेंबर महिन्यापर्यंत रुजू होतील, असंही ते म्हणाले.

वायूदलप्रमुख बीरेंद्रसिंह धनोआ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन वायूदलाची कारवाई, विंग कमांडर अभिनंदन यांबाबतची माहिती दिली.

मृतदेह मोजणं हे आमचं काम नाही, तर दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करणं हे आमचं काम आहे, असं धनोआ यांनी ठणकावून सांगितलं. सध्या देशभरात ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या मृतांच्या आकडेवारीवरुन राजकारण सुरु आहे. त्याला धनोआ यांनी हे उत्तर दिलं.

अभिनंदन रुजू होईल

“अभिनंदन परतला हेच आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. जर तो उड्डाण घेण्यासाठी फिट असेल, तर जरुर रुजू होईल. तो जर तातडीने फिट झाला, तर तो त्याच युनिटमध्ये काम करेल”, असं बी एस धनोआ म्हणाले.

मिग 21 आक्रमक

भारताची मिग 21 विमानं ही आक्रमक आणि अद्ययावत असल्याचं हवाईदल प्रमुखांनी सांगितलं. तसंच पाकिस्तानच्या F-16 विमानात वापरण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचे तुकडे आम्हाला मिळाले, त्यामुळे पाकिस्तानने F16 विमानं वापरल्याचं सिद्ध झालं, असं त्यांनी नमूद केलं.

जर आम्ही जंगलात बॉम्ब फेकले असते, तर पाकिस्तानने कशाला कारवाई केली असती? असा सवाल यावेळी धनोआ यांनी उपस्थित केला. आमचं लक्ष्य साध्य झालं, जी कारवाई आम्हाला करायची होती, ती केली, असं ते म्हणाले.