VIDEO पोस्ट करत माजी गृहराज्यमंत्र्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप, तक्रारीनंतर पीडित मुलगी गायब

| Updated on: Aug 27, 2019 | 11:47 PM

भाजपचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद (Swami Chinmayanand) यांच्यावर एका 23 वर्षीय विद्यार्थीनीने लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली. मात्र, ही मुलगी तक्रारीनंतर गायब झाली आहे.

VIDEO पोस्ट करत माजी गृहराज्यमंत्र्यांवर लैंगिक अत्याचाराचे आरोप, तक्रारीनंतर पीडित मुलगी गायब
Follow us on

लखनौ: भाजपचे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री स्वामी चिन्मयानंद (Swami Chinmayanand) यांच्यावर एका 23 वर्षीय विद्यार्थीनीने लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप केले आहेत. पीडित मुलीने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत तिच्यावरील अत्याचाराची माहिती दिली. मात्र, ही मुलगी तक्रारीनंतर गायब झाली आहे. तिच्या वडिलांनी भाजप नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यविरोधात तक्रार दाखल केली आहे.


पीडित मुलगी स्वामी चिन्मयानंद यांच्या लॉ कॉलेजची विद्यार्थीनी आहे. तिने पोस्ट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ही मुलगी अत्याचाराची माहिती सांगताना अगदी ढसढसा रडते. संत समाजाच्या एका मोठ्या नेत्याने अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. आता त्याने मला आणि माझ्या कुटुंबाला मारुन टाकण्याची धमकी दिली आहे, अशीही तक्रार पीडित मुलीने व्हिडीओत केली आहे.

पोलीस माझ्या खिशात असल्याची धमकी, मुलीचे मोदी आणि योगींना मदतीची विनंती

संबंधित व्हिडीओत मुलगी म्हणत आहे, ‘संत समाजाच्या एका मोठ्या नेत्याने अनेक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. मला देखील मारण्याची धमकी दिली आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करते. कृपया माझी मदत करा. त्याने माझ्या कुटुंबाला देखील मारण्याची धमकी दिली आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलिस आपल्या खिशात आहे. मला कुणीच काही करु शकत नाही, असंही तो सांगतो. माझ्याकडे त्याच्याविरोधात सर्व पुरावे आहे. तुम्हाला विनंती आहे मला न्याय द्या.’ या तक्रारीनंतर पीडित मुलगी अचानक गायब झाली आहे.

मुलीची आई म्हणाली, “माझी मुलगी रक्षाबंधनला घरी आली होती. मी तिला तिचा फोन इतके दिवस बंद का होता म्हणून विचारले. त्यावेळी तिने सांगितलं की माझा फोन माझ्या हातात नसेल तेव्हाच बंद राहू शकतो. त्यामुळे जास्त दिवस फोन लागला नाही, तर मी अडचणीत आहे असं समज. माझी मुलगी खूप अडचणीत असून तिला खूप त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, तरिही तिने आम्हाला काहीही सांगितलं नाही. कॉलेजकडून तिला नैनीताल येथे पाठवण्यात येत आहे इतकच तिने सांगितलं.”

पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार करत चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला आहे. चिन्मयानंद यांच्या प्रवक्त्याने आरोपांचे खंडन केले आहे. तसेच बदनाम करण्यासाठी हे षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला.

स्वामी चिन्मयानंद एनडीए सरकारमध्ये गृह राज्यमंत्री होते. ते राम मंदिर आंदोलनातील मोठे नेते आहेत. शाहजहांपूरमध्ये त्यांचा एक आश्रम आहे. ते येथे एक लॉ कॉलेज देखील चालवतात.