कपडे आणि मेकअपसाठी पाण्यासारखा पैसा खर्च, मिसेस ट्रम्पच्या सौंदर्याचं रहस्य काय?

| Updated on: Feb 24, 2020 | 9:48 AM

मेलानिया (America first lady Melania Trump) आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली आहेत. मात्र, अजूनही मेलानिया एवढ्या सुंदर कशा दिसतात? हा प्रश्न जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे.

कपडे आणि मेकअपसाठी पाण्यासारखा पैसा खर्च, मिसेस ट्रम्पच्या सौंदर्याचं रहस्य काय?
Follow us on

न्यूयॉर्क : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सोमवारी (24 फेब्रुवारी) भारत दौऱ्यावर (America first lady Melania Trump) येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका हे देखील येणार आहेत. दरम्यान, ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया यांच्या सौंदर्याबाबत देशात आतापासूनच चर्चा सुरु झाली आहे. मेलानिया यांच्या सौंदर्यामागील एक रहस्य समोर आलं आहे. मेलानिया दररोज स्वत:च्या मेकअपसाठी 4000 डॉलर म्हणजे तीन लाख रुपये खर्च करतात, अशी माहिती समोर आली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया या लग्नाअगोदर मॉडेलिंग करायच्या (America first lady Melania Trump). जेव्हा डोनाल्ड ट्रम्प मेलानिया यांना पहिल्यांदा भेटले तेव्हा देखील त्या मॉडेलिंग करत होत्या. मेलानिया आणि ट्रम्प यांच्या लग्नाला पंधरा वर्षे झाली आहेत. मात्र, अजूनही मेलानिया एवढ्या सुंदर कशा दिसतात? हा प्रश्न जगभरात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामागील पहिलं आणि महत्त्वाचं कारण हे त्यांचं डाएट आहे. मेलानिया या दिवसाला 7 फळं खातात. याशिवाय त्या दररोज फळांचा ज्यूस पितात.

दुसरं म्हणजे मेलानिया सौंदर्यासाठी तुफान पैसे खर्च करतात. त्यांच्या मेकअपसाठी व्हाईट हाऊसमध्ये मेकअप आर्टिस्ट आहेत. मेलानिया फक्त मेकअपसाठीच नाही तर कपड्यांसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. मेलानिया यांच्या एकाही ड्रेसची किंमत 3 लाखांपेक्षा कमी नाही. व्हाईट हाऊसच्या गार्डनमध्ये फिरण्यासाठी त्यांनी 6 लाखांचा ड्रेस खरेदी केला होता.

मेलानिया गेल्यावर्षी जी-7 परिषदेत सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी डोल्स गब्बाना कंपनीचं जॅकेट परिधान केलं होतं. त्या जॅकेटची किंमत 51,500 डॉलर म्हणजे जवळपास 37 लाख 8 हजार रुपये इतकी होती. मेलानिया एक ड्रेस वापरल्यानंतर पुन्हा वापरत नाहीत. एकदा वापरल्यानंतर तो ड्रेस त्या गरिबांना दान करतात.

मेलानिया (America first lady Melania Trump) अतिशय अलिशान आयुष्य जगतात. त्यांचा व्हाईट हाऊसमधील सोफा हा सोन्याचा आहे. त्यांच्या घरातील भिंतींवर आकर्षक अशा सोन्याच्या वस्तू लावलेल्या आहेत.

मेलानिया यांचा जन्म अमेरिकेत नाही तर स्लोवेनिया येथे झाला होता. तिथे त्यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून मॉडेलिंग सुरु केलं. त्यांनी मिलान आणि पॅरिसमध्ये फॅशन मॉडेल म्हणून काम केलं. त्यानंतर त्या 1996 साली अमेरिकेच्या न्यूयॉर्क शहरात आल्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर त्यांना अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं आणि त्या तिथल्या नागरिक बनल्या.