पुण्याच्या सिरममध्ये तयार होणाऱ्या लसीची अमेरिकेकडून दखल

| Updated on: Nov 24, 2020 | 11:27 PM

अमेरिकेचे कॉन्सुल जनरल डेव्हिड रांज यांनी मंगळवारी सिरम इन्स्टिट्युटला भेट दिली. | covid vaccine

पुण्याच्या सिरममध्ये तयार होणाऱ्या लसीची अमेरिकेकडून दखल
Follow us on

पुणे: कोरोना लशीच्या उत्पादनाचे केंद्र म्हणून सध्या प्रकाशझोतात असलेली पुण्याची सिरम इन्स्टिट्यूट (serum institute) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. येथील कामाचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच सिरमला भेट देणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यापूर्वी अमेरिकेकडून सिरमच्या लशीची (covid vaccine) दखल घेण्यात आली आहे. (American consul general david Ranz visit pune serum institute)

अमेरिकेचे कॉन्सुल जनरल डेव्हिड रांज यांनी मंगळवारी सिरम इन्स्टिट्युटला भेट दिली. त्यांनी कोरोना लसीसंदर्भातील आढावा घेतला. तसेच सिरम कंपनीच्या अधिकाऱ्यांशी तब्बल तासभर चर्चा केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुण्यात

कोरोना लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनी सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. जगभरातील 100 देशांचे राजदूत 4 डिसेंबर रोजी एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. हे सर्व राजदूत दोन गटात सिरम इन्स्टिट्यूट आणि जिनोव्हा बायो-फार्मासिटिक्युअल्स कंपनीला भेट देणार आहेत.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील 28 नोव्हेंबरला सिरमला भेट देणार असल्याची चर्चा आहे. मोदींचा प्राथमिक दौरा निश्चित झाला असला तरी त्यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळेच इतर देशांच्या राजदूतांचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जाते.

कोरोना लशीच्या वितरणासाठी आतापासूनच तयारीला लागा; पंतप्रधान मोदींचे राज्यांना आदेश

आगामी काळात कोरोना लशीच्या (Covid Vaccine) वितरणासाठी प्रत्येक राज्याने आतापासूनच तयारीला लागावे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली. कोरोना लशीच्या वितरणात राज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. कारण लशीचे वितरण राज्यांतील यंत्रणेच्या माध्यमातूनच पार पडणार आहे. या कामात राज्यांचा अनुभव कामी येणार आहे. त्यासाठी राज्यांनी कोरोना लशीच्या वितरणासाठी आतापासूनच पुढाकार घेऊन काम करायला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

…अन् ‘त्या’ एका चुकीमुळे ऑक्सफर्डची लस अधिक परिणामकारक असल्याचा लागला शोध 

भारतात कसा असणार कोरोना लस वितरणाचा प्लॅन, केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणतात….

अमित शाहांचा कोरोना नियंत्रणासाठी तीन कलमी कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांना कार्यवाहीच्या सूचना (tv9marathi.com)

(American consul general david Ranz visit pune serum institute)