VIDEO: घोड्यावरुन परीक्षेला जाणाऱ्या ‘या’ मुलीचा व्हिडीओ व्हायरल, आनंद महिंद्रांकडूनही शेअर

| Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM

नवी दिल्ली:  सोशल मीडियावर नेहमीच कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. यात स्टंटपासून गमतीदार व्हिडीओंचा समावेश असतो. अनेकदा तर बनावट व्हिडीओही खरे म्हणून शेअर होतात. मात्र, सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शालेय गणवेशातील एक मुलगी घोड्यावर सवार होऊन रस्त्याने जात आहे. तिच्या पाठीवर ‘स्कुल बॅग’ही दिसत आहे. Brilliant! Girls’ education […]

VIDEO: घोड्यावरुन परीक्षेला जाणाऱ्या या मुलीचा व्हिडीओ व्हायरल, आनंद महिंद्रांकडूनही शेअर
Follow us on

नवी दिल्ली:  सोशल मीडियावर नेहमीच कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होत असतो. यात स्टंटपासून गमतीदार व्हिडीओंचा समावेश असतो. अनेकदा तर बनावट व्हिडीओही खरे म्हणून शेअर होतात. मात्र, सध्या एक वेगळाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शालेय गणवेशातील एक मुलगी घोड्यावर सवार होऊन रस्त्याने जात आहे. तिच्या पाठीवर ‘स्कुल बॅग’ही दिसत आहे.

शाळकरी मुलीच्या या व्हिडीओला लोकांनी चांगलीच पसंती दिली जात आहे. तसेच मुलीच्या धाडसाचे अनेकांकडून कौतुकही होत आहे. संबंधित व्हिडीओ केरळमधील त्रिशूर जिल्ह्याचा असल्याचे सांगितले जात आहे. ही मुलगी 10 वीच्या वर्गात शिकत आहे. व्हिडीओ काढला तेव्हा ती आपली वार्षिक परीक्षा देण्यासाठी जात होती. उद्योगपती आनंद महिंद्रा यांनाही हा व्हिडीओ चांगलाच आवडला आहे. त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत मुलीचे कौतुक केले. देशात मुलींचे शिक्षण पुढे जात असल्याचे म्हणत त्यांनी हा व्हिडीओ जगभरात व्हायरल व्हायला हवा, अशी इच्छाही व्यक्त केली. आपल्या ट्विटमध्ये महिंद्रा यांनी मुलीचा हा व्हिडीओ देखील ‘अतुल्य भारत’चा भाग असल्याचे म्हटले आहे.

संबंधित व्हिडीओत शाळकरी मुलगी अत्यंत सहजपणे आणि सराईतपणे घोडेसवारी करताना दिसत आहे. अशी घोडेसवारी नक्कीच सर्वांना शक्य नसते. ज्या रस्त्यावर ती घोडा चालवत आहे, तो रस्ता मोठ्या गर्दीचा मानला जातो. मुलगी घोड्यावरुन जात असताना कुणीतरी तिचा व्हिडीओही काढत असल्याचे व्हिडीओमध्ये लक्षात येत आहे.

पाहा व्हिडीओ: