Anushka Sharma| पालकांनो, मुलांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवा, अनुष्का शर्माची संतप्त प्रतिक्रिया!

| Updated on: Oct 03, 2020 | 2:39 PM

संतप्त अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जळजळीत पोस्ट लिहीत आपला राग व्यक्त केला आहे.

Anushka Sharma| पालकांनो, मुलांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवा, अनुष्का शर्माची संतप्त प्रतिक्रिया!
Follow us on

मुंबई : उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर येथे सलग दोन दिवस घडलेल्या सामूहिक बलात्कार (Gang Rape) प्रकरणांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनांतील दोन्ही पीडितांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त केला जात असतानाच बॉलिवूड कलाकारही आपला राग व्यक्त करत आहेत. ‘मुलांना स्त्रियांचा सन्मान करायला शिकवणे, ही पालकांची जबाबदारी आहे’, असे म्हणत अभिनेत्री अनुष्का शर्मानेही (Anushka Sharma) आपला संताप व्यक्त केला आहे (Anushka Sharma Reacted On Gang Rape Cases).

संतप्त अनुष्का शर्माने (Anushka Sharma) तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर जळजळीत पोस्ट लिहीत आपला राग व्यक्त केला आहे. ‘आपल्या समाजात मुलाचा जन्म झाल्यावर त्याला “विशेषाधिकार” मिळतो. आपल्या मुलांना स्त्रियांचा आदर करण्यास शिकवणे ही कुटुंबाची जबाबदारी आहे. स्त्रियांना सुरक्षित वाटू द्या’, असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘आपल्या समाजात पुरुष मुलाला ‘विशेषाधिकार’ म्हणून पाहिले जाते. परंतु स्त्रियांकडे विशेषाधिकार म्हणून न पाहता, तिलाही ‘विशेषाधिकार’ देण्यात यावा’, असे ही तिने म्हटले आहे.

हाथरस-बलरामपूर प्रकरणावर भडकली अनुष्का

उत्तर प्रदेशातील हाथरस आणि बलरामपूर सामूहिक बलात्कार (Gang Rape) घटनांवर देखील अनुष्काने पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला होता. ‘आधी हाथरस आणि काहीच वेळाने बलरामपूरच्या या दुष्कृत्याची माहिती मिळाली. या जगातील हे राक्षस एखाद्या जीवाचे असे हाल करण्याचा विचारच कसा करू शकतात? यांना काही भय आहे की नाही?’, असा संतप्त सवाल तिने या पोस्टमधून विचारला आहे. (Anushka Sharma Reacted On Gang Rape Cases)

सुनील गावस्करांच्या आक्षेपार्ह कमेंटवर भडकलेली अनुष्का

अनुष्काने गर्भवती असल्याने चित्रपटांतून ब्रेक घेतला आहे. मात्र, सोशल मिडीयाच्या माध्यमातून ती व्यक्त होत असते. काहीच दिवसांपूर्वी विराट कोहलीच्या खेळीबद्दल बोलताना क्रिकेट समालोचक सुनील गावस्कर यांनी विराट-अनुष्कावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावर अभिनेत्री अनुष्का शर्माने (Anushka Sharma) त्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. “मिस्टर गावस्कर मी आपला सन्मान करते. पण, मला तुमची कमेंट आवडली नाही. मी तुम्हाला प्रत्युत्तर देऊ इच्छिते”, असे म्हणत अनुष्काने गावस्करांना उत्तर देणारी इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली होती.

“मिस्टर गावस्कर आपण माझ्या पतीच्या (विराटच्या) खेळीबद्दल बोलताना माझ्या नावाचा उल्लेख केला. अनेक वर्षांपासून मला माहिती आहे की क्रिकेटर्सच्या खाजगी आयुष्याबद्दल आपण त्यांचा सन्मान करता. आपल्याला वाटत नाही का की आम्ही देखील त्याचे हकदार आहोत?”, असा सवाल अनुष्काने गावस्कर यांना विचारला होता.

“आपण दुसऱ्या कोणत्याही शब्दात माझ्या पतीच्या (विराटच्या) खेळावर टीका करू शकला असतात. परंतू आपण टीका करत असताना त्यामध्ये माझं नाव देखील घेतलं. तुम्हाला काय वाटतं तुम्ही हे बरोबर केलंय?”, असा सवाल अनुष्काने (Anushka sharma) उपस्थित केला होता.

“सध्या 2020 हे वर्ष सुरू आहे. मात्र, माझ्यासाठी आजही काही गोष्टी चांगल्या होत नाहीत. माझं नाव नेहमी क्रिकेट कॉमेन्ट्रीमध्ये ओढलं जातं. मी तुमचा खूप सन्मान करते. तुम्ही या खेळाचे दिग्गज आहात. मी तुम्हाला फक्त सांगू इच्छिते, आपणही समजू शकता की तुम्ही माझं नाव घेतल्यावर मला कसं वाटलं असेल?”, असे संतप्त अनुष्काने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते.

(Anushka Sharma Reacted On Gang Rape Cases)

संबंधित बातम्या : 

कॉमेंट्रीत विराट-अनुष्काविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, सुनील गावस्करांवर चाहते बरसले

कॉमेंट्रीदरम्यान आक्षेपार्ह कमेंट, अनुष्काचं सुनील गावस्करांना सडेतोड उत्तर