आधारकार्ड हरवलंय? आता चिंता मिटली

| Updated on: Jul 05, 2019 | 4:50 PM

मुंबई : आधार कार्ड हरवले अथवा खराब झाले, तर आता काळजी करायची गरज नाही. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आपल्या वेबसाईटवर एक नवी सेवा चालू केली आहे. ज्या माध्यमातून तुम्ही तुमचे हरवलेले आधार कार्ड कमी कालावधीत घर बसल्या पुन्हा मिळवू शकता. UIDAI च्या या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला काही पैसे […]

आधारकार्ड हरवलंय? आता चिंता मिटली
सध्याच्या काळात आधार कार्ड खूप महत्वाचे आहे. सिम कार्ड घेण्यापासून पीएफसारख्या अनेक सेवांसाठी आधार कार्ड असणे फार महत्वाचे आहे. त्यामुळे सरकारी योजनांपासून अगदी घरगुती कामकाजासाठी आधार कार्ड गरज भासते. सध्या बऱ्याच ठिकाणी आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जात आहे.
Follow us on

मुंबई : आधार कार्ड हरवले अथवा खराब झाले, तर आता काळजी करायची गरज नाही. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आपल्या वेबसाईटवर एक नवी सेवा चालू केली आहे. ज्या माध्यमातून तुम्ही तुमचे हरवलेले आधार कार्ड कमी कालावधीत घर बसल्या पुन्हा मिळवू शकता. UIDAI च्या या निर्णयामुळे नागरिकांचा वेळ वाचणार आहे. मात्र यासाठी तुम्हाला काही पैसे भरावे लागणार आहेत.

पहिले आधार कार्ड हरवले जायचे तेव्हा UIDAI च्या वेबसाईटवरुन आधार कार्डचे इ-व्हर्जन डाऊनलोड करुन त्याच्यावर काम चालवत होते. UIDAI च्या नुसार आता 50 रुपये भरुन रिप्रिंट आधार कार्ड ऑनलाईन मागवू शकता. रिप्रिंट आधारकार्ड पोस्टद्वारे तुमच्या घरी येईल. रिप्रिंट आधारकार्ड मिळवण्यासाठी आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आयडेंटिफिकेशन नंबर (VID) च्या माध्यमातून आवेदन करुन शकता.

रिप्रिंट आधारकार्ड ऑर्डर करण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारकार्ड सोबत रजिस्टर असावा, कारण ओटीपी कोड तुम्हाला त्याच नंबरवर मिळणार आहे. जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर तुम्ही नॉन-रजिस्टर नंबरद्वारेही रिप्रिंट आधार कार्ड मिळवू शकता.

कसं मिळवाल आधार रिप्रिंट आधार कार्ड

यूआयडीएआयच्या वेबसाईटवर (www.uidai.gov.in) जावा आणि आधार सर्व्हिसमध्ये ऑर्डर आधार रिप्रिंट वर क्लिक करा.

 

 

तुमच्या कम्प्युटरवर एक नवीन टॅब चालू होईल. यामध्ये 12 अंकी आपला आधार कार्ड नंबर किंवा 16 अंकी व्हीआयडी नंबर आणि सिक्युरिटी कोड टाकावा लागेल. जर मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर या संबंधित बॉक्सवर क्लिक करावे लागेल.

  • मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर सेंड ओटीपीवर क्लिक करा.
  • ओटीपी इंटर करा आणि अॅग्री टू टर्म अँड कंडिशन्सच्या बॉक्स सिलेक्ट करा आणि सबमिटवर क्लिक करा.
  • ओटीपी इंटर केल्यानंतर तुम्ही तुमच्या आधार डिटेल व्हेरिफाय (मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर) करु शकता.
  • कॉम्प्यूटरवर दिसणाऱ्या आधार डिटेल्स चेक करा, जर यामध्ये काही चुका दिसल्यास आपल्या जवळच्या आधार सेवा केंद्रावर जावं लागेल.
  • आधार डिटेलच्या व्हेरिफिकेशन नंतर मेक पेमेंट ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
  • तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेटबँकिंग किंवा युपीआयद्वारे 50 रुपयांचे भुगतान करावे लागेल. कार्डची डिटेल इंटर केल्यानंतर ‘पे’ नाउ वर क्लिक करावे लागेल.