अ‍ॅक्सिस बँकेची ग्राहकांना खूशखबर, बचत खात्यावरी ल व्याजदरात वाढ; जाणून घ्या-नवे दर

| Updated on: May 12, 2022 | 3:09 PM

अ‍ॅक्सिस बँकेने 10 मे पासून बचत खात्यावरील व्याजदरात 3-3.5 टक्क्यांदरम्यान वाढ केली आहे. सुधारीत नियमानुसार, 10 मे पासून 50 लाखांपेक्षा बचत खात्यातीस कमी रकमेवर वार्षिक तीन टक्के व्याज दिले जाईल.

अ‍ॅक्सिस बँकेची ग्राहकांना खूशखबर, बचत खात्यावरी ल व्याजदरात वाढ; जाणून घ्या-नवे दर
Axis Bank कडून ग्राहकांना खूशखबर
Follow us on

नवी दिल्लीः खासगी क्षेत्रातील आघाडीच्या अ‍ॅक्सिस बँकेने (AXIS BANK) ग्राहकांना गूड न्यूज दिली आहे. अ‍ॅक्सिस बँकेने बचत खात्यातील (SAVING ACCOUNT) व्याजदरात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅक्सिस बँकेने 10 मे पासून बचत खात्यावरील व्याजदरात 3-3.5 टक्क्यांदरम्यान वाढ केली आहे. सुधारीत नियमानुसार, 10 मे पासून 50 लाखांपेक्षा बचत खात्यातीस कमी रकमेवर वार्षिक तीन टक्के व्याज दिले जाईल. तर 50 लाख ते 2500 कोटी रुपयांच्या रकमेवर 3.5 टक्के व्याज दिले जाईल. अ‍ॅक्सिस बँकेच्या संकेतस्थळावर व्याजदराच्या फेररचनेची (RATE MODIFICATION) घोषणा केली आहे. नियमित आधारावर व्याज दराची गणना केली जाते आणि पुढील तिमाहीच्या पहिल्या दिवशी खात्यात जमा केले जाते. बचत खात्यातील व्याजदर खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असतो. तसेच बचत खात्यातील विशिष्ट रक्कम करपात्र ठरते.

कर्ज महागलं

रिझर्व्ह बँकेच्या रेपो दरातील फेररचनेनंतर अ‍ॅक्सिस बँकेने एमसीएलआर मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे बँकेचे कर्ज महाग झाले होते. एमसीएलआर मध्ये वाढ केल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्ज महाग झाले. त्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त EMI चा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

देशभरात विस्तार

अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड ही भारतातील खासगी क्षेत्रातील आघाडीची बँक मानली जाते. अ‍ॅक्सिस बँकेचा देशभरात विस्तार असून 4800 शाखा, 17801 एटीएम आणि नऊ आंतरराष्ट्रीय कार्यालये आहेत. बँकेचे बाजार भांडवल 2.31 ट्रिलियन (US$५१.२८ बिलियन) वर पोहोचले आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राचा निर्णय

पुणे स्थित महाराष्ट्र बँकेने सर्व कालावधीसाठीच्या एमसीएलआर मध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एमसीएलआर मध्ये 0.15 टक्के वाढ करण्यात आली आहे. बँक ऑफ महाराष्ट्राचे सुधारित एमसीएलआरची अंमलबजावणी 7 मे पासून केली जाणार आहे.

बँक ऑफ महाराष्ट्राचे नवे एमसीएलआर

· एक वर्ष- 7.40%

· एक-तीन-सहा महिने- 6.85-7.30%

रेपो दर किती?

रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात 0.4 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. नव्या बदलासह रेपो दर 4.4 टक्क्यांवर पोहोचला आहे. रेपो दर वाढीमुळे अन्य बँकांच्या कर्जदरात वाढ होणे निश्चित मानले जात आहे.