चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे : बाळासाहेब थोरात

| Updated on: Jun 03, 2020 | 4:10 PM

चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्रात येऊन धडकलं आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्राचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नसल्याचं सांगितलं आहे (Balasaheb Thorat on Nisarga Cyclone).

चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नाही, तरीही पुढील 2-3 तास महत्त्वाचे : बाळासाहेब थोरात
Follow us on

मुंबई : चक्रीवादळाचं संकट महाराष्ट्रात येऊन धडकलं आहे. त्यामुळे सर्वत्र काळजीचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना महाराष्ट्राचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलं नसल्याचं सांगितलं आहे (Balasaheb Thorat on Nisarga Cyclone). तसेच चक्रीवादळ हे मुंबईच्या जवळून जाणार आहे. असं असलं तरी वादळाचा वेग आणि त्याची बदलणारी दिशा यामुळे पुढील 2-3 तास महत्त्वाचे असणार आहे, असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “काही तासांपूर्वीच या चक्रीवादळाने महाराष्ट्राच्या जमिनीवर प्रवेश केला आहे. त्याला लँडफॉल असा शब्दप्रयोग केला जातो. अलिबागकडून हे वादळ रायगड जिल्ह्याकडे जात आहे. या चक्रीवादळाचा ताशी वेग 100 किलोमीटरपेक्षा अधिक आहे. 110 किलोमीटर प्रतितास इथपर्यंत हा वेग आहे, असं सांगितलं जात आहे. या वेगाने हे वादळ पुढे जात आहे. राज्य सरकारच्या सर्व यंत्रणा सज्ज असून सतर्क आहेत. झाडं पडत आहेत, काही ठिकाणी घरांचे पत्रे उडत आहेत अशी स्थिती आहे. मात्र, संपूर्ण प्रशासन त्याचा सामना करण्यासाठी सतर्क आहे.”

एनडीआरएफची पथकं तयार आहेत, आपले जवान तयार आहेत. सोबतच जिल्हा प्रशासन देखील सतर्कपणे काम करत आहे. मी आत्ताच जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, नियंत्रण कक्षाच्या प्रमुखांसोबतही मी चर्चा केली. हे वादळ जात असताना कोठेही जीवितहानी होऊ नये याची काळजी घेतली जात आहे, असंही थोरात यांनी सांगितलं.

बाळासाहेब थोरात यांनी पुढील 2 ते 3 तास महत्त्वाचे असल्याचंही म्हटलं. ते म्हणाले, “नियंत्रण कक्षाशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं आहे, की या चक्रीवादळाचं केंद्र मुंबई राहिलेलं नाही. केवळ मुंबईच्या जवळून हे वादळ जाईल. पुढील 2 ते 3 तास खूप महत्त्वाचे आहेत. ते वादळ कसं पुढे सरकतं आहे त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. हे वादळ मुंबईच्या जवळून जात असल्याने वेग वाढू शकतो, दिशा बदलू शकते अशा काही गोष्टी होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना मोठ्या प्रमाणात सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. या व्यतिरिक्त देखील जिथं आवश्यक आहे तिथं प्रशासन देखील मदत करत आहे.”

नागरिकांनी काळजी घेण्याबाबत त्यांना संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. रायगड आणि ठाण्यानंतर नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात या वादळाचा प्रवेश होईल. तिकडे देखील प्रशासन अलर्ट आहे. जी स्थिती असेल त्याला सामोरं जायला प्रशासन पूर्ण तयार आहे, असं थोरात यांनी नमूद केलं.


दरम्यान, हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंदकर म्हणाले, “चक्रीवादळ मुंबईला पोहोचण्याची शक्यता कमी, सध्याच्या वाऱ्याची दिशा पाहता मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल, मात्र चक्रीवादळ मुंबईपर्यंत पोहोचणार नाही, वादळ पेणकडून ठाण्याकडे पुढे सरकेल.

संबंधित बातम्या :

Cyclone Nisarga | वादळ दिशाबदलाची शक्यता नाही, तासाभरात चक्रीवादळ ठाणे-मुंबईच्या दिशेने : हवामान विभाग

CYCLONE NISARGA LIVE | चक्रीवादळ अलिबागला धडकले

Cyclone Nisarga | ‘निसर्ग’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचं महत्त्वाचं आवाहन

VIDEO | रत्नागिरीत मिऱ्या समुद्रावर भरकटलेले जहाज संरक्षक भिंतीवर धडकले

Balasaheb Thorat on Nisarga Cyclone