CYCLONE NISARGA LIVE | येत्या अडीच तासात कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

महाराष्ट्रावर घोंगावणारे 'निसर्ग' चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलं. मात्र मुंबईवरचं संकट टळलं आहे. Cyclone Nisarga Live Updates

CYCLONE NISARGA LIVE | येत्या अडीच तासात कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता


मुंबई : महाराष्ट्रावर घोंगावणारे ‘निसर्ग’ चक्रीवादळ कोकणाच्या किनारपट्टीवर धडकलं. मात्र मुंबईवरचं संकट टळलं आहे. चक्रीवादळ रायगडमधून अलिबाग, पेण, पनवेल मार्गे ठाण्याच्या दिशेने नाशिककडे वळले. “मुंबईवरचं संकट टळलं, मुंबईकरांची धारणा आहे सिद्धिविनायक, मुंबादेवी, महालक्ष्मी रक्षण करते, मात्र केवळ देवदेवतांवर अवलंबून न राहता, मानवी उपाययोजना केल्या. आजचं संकट टळलं असेल तरी उद्याही खबरदारी घ्यायची आहे”, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं.  

रायगडमध्ये दुपारी एकच्या सुमारास वादळ धडकण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. अलिबागमध्ये वादळ धडकल्यानंतर पुढे सरकून ते पेण, पनवेलच्या बाजूने सरकले. त्यापूर्वी  दुपारी 12.20 च्या सुमारास रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात या वादळाचा परिणाम जाणवला. दुपारी साडेबाराच्या सुमारास हे वादळ मुंबईपासून जवळपास 130 किमी अंतरावर पोहोचलं.

मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती,.

Cyclone Nisarga Live Updates

[svt-event title=”येत्या अडीच तासात कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता” date=”03/06/2020,9:43PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळाची 50 दृश्ये” date=”03/06/2020,9:06PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”पुण्यावरुन पुढं गेल्यावर वादळाची तीव्रता कमी” date=”03/06/2020,8:58PM” class=”svt-cd-green” ] पुण्यावरुन पुढं गेल्यावर वादळाची तीव्रता कमी, हवामान खात्याची माहिती, पुढच्या तीन तासात वादळाचा प्रभाव कमी होणार, मुंबईपासून ९० किमी आणि पुण्यापासून ५० किमी अंतरावर वादळाची तीव्रता कमी होण्यास सुरुवात झाली [/svt-event]

[svt-event title=”आदित्य ठाकरेंकडून मुंबईच्या सर्व सहआयुक्तांचं कौतुक” date=”03/06/2020,8:29PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चक्रीवादळाचा दुसरा बळी, रायगडनंतर पुण्यातही एकाचा मृत्यू” date=”03/06/2020,7:28PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रायगडमध्ये चक्रीवादळाचा पहिला बळी, विजेचा खांब कोसळून एकाचा मृत्यू” date=”03/06/2020,7:12PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईंवरचा चक्रीवादळाचा धोका टळला – नागपूर IMDची माहिती ” date=”03/06/2020,7:06PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळ कोकण सोडून मध्य महाराष्ट्रात ” date=”03/06/2020,7:03PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील वेल्हा, मुळशी, खेड, जुन्नर तालुक्याला चक्रीवादळाचा फटका ” date=”03/06/2020,6:06PM” class=”svt-cd-green” ] पुणे – पुणे जिल्ह्यातील वेल्हा, मुळशी, खेड, जुन्नर या तालुक्यात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसला आहे. या तालुक्यातील अनेक गावातील झाडे उन्मळून पडली असून, घरे, अंगणवाडी यावरील पत्रे उडून गेलेत. पावसासह जोरदार वारे या भागात वाहत आहेत. [/svt-event]

[svt-event title=”पुढच्या 6 तासात वादळाचं संकट दूर होईल” date=”03/06/2020,5:35PM” class=”svt-cd-green” ] पुढच्या 6 तासात वादळाचं संकट दूर होऊन हळूहळू वादळाची तीव्रता कमी होणार, हवामान विभागाची माहिती, ठाणे, पालघर, नाशिकसह उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस बरसतच राहणार [/svt-event]

[svt-event title=” मुंबईत सध्यस्थितीला धोका नाही – नागपूर IMD” date=”03/06/2020,4:24PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईवरचं संकट टळलं, तरीही खबरदारी घेऊ : महापौर” date=”03/06/2020,4:04PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चक्रीवादळ मुंबईला पोहोचण्याची शक्यता कमी” date=”03/06/2020,3:25PM” class=”svt-cd-green” ] चक्रीवादळ मुंबईला पोहोचण्याची शक्यता कमी, सध्याच्या वाऱ्याची दिशा पाहता मुंबईत जोरदार पाऊस कोसळेल, मात्र चक्रीवादळ मुंबईपर्यंत पोहोचणार नाही – श्रीनिवास औंदकर, हवामान तज्ज्ञ [/svt-event]

[svt-event title=”मंडणगड परिसरात मोबाईल नेटवर्क गायब” date=”03/06/2020,3:20PM” class=”svt-cd-green” ] निसर्ग वादळ आज सकाळी रत्नागिरीच्या किनारपट्टीलगत येऊन पुढे सरकले. या वाऱ्याचा वेग ताशी 120 किलोमीटर होता. यामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी झाडे पडणे, पत्रे उडून जाणे, रस्ते बंद होणे, असे प्रकार घडले आहेत. सर्वाधिक नुकसान दापोली आणि मंडणगड भागात झाले आहे. जिल्ह्यात सर्वत्र वीज पुरवठा बंद आहे. रस्ता सुरू करण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. आंबा घाटात झाड कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती, आता एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. मंडणगड आणि लगतच्या भागात मोबाईल कनेक्टिविटी पूर्णपणे बंद पडली आहे. [/svt-event]

[svt-event title=”मुंबई – काळाचौकी परिसरात वादळी वाऱ्याने झाड टॅक्सीवर कोसळले” date=”03/06/2020,2:29PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात ” date=”03/06/2020,2:25PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”निसर्ग चक्रीवादळ अलिबागला धडकले” date=”03/06/2020,2:16PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी लाईव्ह” date=”03/06/2020,2:00PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चक्रीवादळ पुढील तासाभरात मुंबई-ठाण्याच्या दिशेने” date=”03/06/2020,1:47PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वादळाची लँड फॉल हेण्यास सुरुवात” date=”03/06/2020,1:40PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वादळाची प्रत्येक बातमी पाहा लाईव्ह” date=”03/06/2020,1:24PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”चक्रीवादळ जमिनीला धडकण्याची प्रक्रिया सुरु” date=”03/06/2020,1:09PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुढील अडीच तासात ठाणे आणि मुंबईत चक्रीवादळ धडकणार, हवामान विभागाची माहिती” date=”03/06/2020,12:54PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मालवण दांडी समुद्र किनाऱ्यावर लाटांना उधाण” date=”03/06/2020,12:28PM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”तटरक्षक दलाची 8 पथकं राज्यात तैनात” date=”03/06/2020,12:10PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अलिबागपासून १३० किमी अंतरावर निसर्ग वादळ” date=”03/06/2020,12:08PM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडून वरळी, महालक्ष्मी, हाजी अली परिसराची पाहणी ” date=”03/06/2020,11:38AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”भाईंदरच्या उत्तन सागरी किनाऱ्याजवळील 5 हजार नागरिकांचं स्थलांतर” date=”03/06/2020,10:54AM” class=”svt-cd-green” ] भाईंदरच्या उत्तन सागरी किनारपट्टीवर NDRF,पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान सज्ज.किनारपट्टीवरील जवळपास 5000 हजार नागरिकांना शाळा आणि चर्चमध्ये सुरक्षितस्थळी हलवलं, मिरा भाईंदर मनपा आयुक्त चंद्रकांत डांगे यांची माहिती. उत्तन किनारपट्टीवर जवळपास 7 ते 8 हजार नागरिकांचं वास्तव्य, उत्तन किनारपट्टीवर 2.30 ते 3.00 वाजेपर्यंत चक्रीवादळ धडकण्याची शक्यता [/svt-event]

[svt-event title=”चक्रीवादळ, पावसाच्या सुपरफास्ट बातम्या” date=”03/06/2020,10:41AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”कोकण किनारपट्टीवर तब्बल 11 हजार 260 नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर” date=”03/06/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरी- मिऱ्या समुद्रात अजस्त्र लाटामध्ये जहाज भरकटले,” date=”03/06/2020,9:54AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चक्रीवादळ, पावसाच्या सुपरफास्ट बातम्या” date=”03/06/2020,09:50AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”मुंबईतील मरिन ड्राईव्हची दृश्ये” date=”03/06/2020,9:42AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईत वाऱ्याचा वेग वाढला” date=”03/06/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत वाऱ्याने वेग पकडला” date=”03/06/2020,9:41AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”पुण्यातील हडपसर, येरवडा, वडगाव शेरीत जोरदार पाऊस” date=”03/06/2020,9:30AM” class=”svt-cd-green” ] [/svt-event]

[svt-event title=”चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबईकरांना सूचना” date=”03/06/2020,9:11AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रायगड जिल्ह्यात 11 हजारांहून अधिक जणांचे स्थलांतर” date=”03/06/2020,9:10AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”वाऱ्याचा वेग ताशी 90-100 किमी” date=”03/06/2020,8:55AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उत्तर रत्नागिरीला जोरदार वारे आणि पावसाचा तडाखा” date=”03/06/2020,8:30AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबईपासून 190 किमी दूर अंतरावर” date=”03/06/2020,8:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”डहाणूमध्ये NDRF ची पथके तैनात” date=”03/06/2020,8:05AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी निसर्ग चक्रीवादळाची स्थिती” date=”03/06/2020,8:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”उत्तर कोकणात अतिमुसळधार पावसाचा इशारा” date=”03/06/2020,7:51AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”रत्नागिरीत पाऊस आणि सोसाट्याचा वारा” date=”03/06/2020,7:40AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”अलिबागला वादळ धडकण्यापर्यंत वाऱ्याचा वेग 80 किमी होणार” date=”03/06/2020,7:38AM” class=”svt-cd-green” ] निसर्ग चक्रीवादळ अलिबागपासून 155 किमी वर, तर मुंबईपासून 200 किमी दूर, गेल्या 6 तासांपासून वादळाचा वेग वाढत ताशी 13 किमीवर, भारतीय हवामान विभागाची माहिती, अलिबागला वादळ धडकण्यापर्यंत वाऱ्याचा वेग 80 किमी होणार [/svt-event]

[svt-event title=”तटरक्षक दलाकड़ून 109 मच्छिमारांची सुटका” date=”03/06/2020,7:36AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

(Cyclone Nisarga Live Updates)

[svt-event title=”रत्नागिरीतल्या 3 तालुक्यांना रेड अलर्ट ” date=”03/06/2020,7:34AM” class=”svt-cd-green” ] रत्नागिरीतील 3 तालुक्यांना वादळाचा मोठा धोका, मंडणगड, गुहागर, दापोली तालुक्यास रेड अलर्ट, रत्नागिरी जिल्ह्यात 4 हजार लोकांचे स्थलांतर, जिल्हाधिकाऱ्यांकडून आज संचारबंदीची घोषणा [/svt-event]

[svt-event title=”चक्रीवादळाचा अधिक धोका कुठे?” date=”03/06/2020,7:33AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”राज्यात एनडीआरएफच्या आणखी 5 टीम तैनात” date=”03/06/2020,7:20AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”मुंबई विमानतळ प्रशासनाकडून 31 विमाने रद्द” date=”03/06/2020,7:15AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

[svt-event title=”चक्रीवादळाची नेमकी स्थिती काय?” date=”03/06/2020,7:00AM” class=”svt-cd-green” ]

[/svt-event]

‘निसर्ग’ चक्रीवादळाची थोडक्यात माहिती

🌀 अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं चक्रीवादळ निर्माण झाले

🌀 या चक्रीवादळाला बांगलादेशने ‘निसर्ग’ नाव सुचवले आहे.

🌀 3 जूनला उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरात, रायगड, हरिहरेश्र्वर आणि दमण भागातून जाण्याचा इशारा

🌀 रत्नागिरी, पालघरसह मुंबईवरही चक्रीवादळाचा परिणाम होण्याची शक्यता

चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र

1. प्रथमोपचार पेटी तयार ठेवा, औषध गोळ्या असू द्या
2. पाणी उकळूनच प्या, थंड पाणी टाळा
3. सगळी इलेक्ट्रीक उपकरणं बंद करा, गॅसही बंद ठेवा
4. दारं, खिडक्या बंद ठेवा
5. घराचं काम पूर्ण करा, टोकदार गोष्टी बांधून ठेवा
6. तुमची महत्वाची कागदपत्रं वॉटरप्रुफ करून ठेवा
7. मोबाईल चार्ज करुन ठेवा, एसएमएसचा वापर करा
8. जर तुमचं घर असुरक्षित असेल तर सुरक्षित ठिकाण गाठा
(Preparedness for Nisarga Cyclone by Maharashtra Government)
9. मोडकळीस आलेल्या इमारती किंवा घरात जाऊ नका
10. विद्युत तार, खांब यापासून दूर राहा
11. समुद्रात किंवा किनारी जाऊ नका
12. जनावरं, प्राण्यांना बांधून न ठेवता मोकळं सोडा
13. माहितीसाठी न्यूज चॅनल, रेडिओ ऐकत राहा
14. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका
15. फक्त प्रशासनाच्या सूचना वेळेच्या वेळेला लक्षात असू द्या

निसर्ग चक्रीवादळ आणि मुंबई

1. शंभर वर्षात पहिल्यांदाच मुंबईच्या किनाऱ्यावर चक्रीवादळ धडकेल

2. निसर्ग चक्रीवादळाचा वेग ताशी 90 ते 125 किमीपर्यंत राहण्याचा अंदाज

3. निसर्ग चक्रीवादळ हे तीव्र स्वरुपाचं वादळ मानलं जातं आहे

4. समुद्र किनाऱ्यावर दोन मीटर उंचीपर्यंत लाटा उसळण्याचा अंदाज

5. मुंबई, ठाणे, रायगडच्या खोल भागात पाणी शिरण्याची भीती

6. महाराष्ट्रात पहिल्यांदा हरिहरेश्वरला धडकण्याचा अंदाज

7. मुंबईसह महाराष्ट्राच्या 7 जिल्ह्यात सर्वाधिक परिणाम होण्याची भीती

8. मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये सर्वाधिक परिणाम होण्याचा इशारा

9. चक्रीवादळाला निसर्ग हे नाव बांगलादेशनं दिलं

10. मुंबईत सर्व समुद्रकिनाऱ्यावर सतर्कतेचा इशारा

संबंधित बातम्या : 

Cyclone Nisarga | चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र

शंभर वर्षात पहिल्यांदाच मुंबईत चक्रीवादळाची शक्यता, काय आहे निसर्ग चक्रीवादळ?

Cyclone Nisarga live : निसर्ग चक्रीवादळ, NDRF ची पथकं तैनात, समुद्र किनारी वादळापूर्वीची शांतता

Nisarga Cyclone | रायगडमध्ये 3 जूनला जनता कर्फ्यू, आपत्ती व्यवस्थापनासह नॉन कोव्हिड रुग्णालयही उपलब्ध

चक्रीवादळाचा संभाव्य धोका, मुंबईकरांसाठी महापालिकेच्या महत्त्वाच्या सूचना

(Cyclone Nisarga Live Updates)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI