AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone Nisarga | चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र

कोकण किनारपट्टीवर निसर्ग वादळ घोंघावण्याची चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे. (How to keep yourself safe during Cyclone Nisarga)

Cyclone Nisarga | चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र
| Updated on: Jun 02, 2020 | 4:04 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर निसर्ग चक्रीवादळ धडकण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मुंबईपासून 600 किलोमीटरपर्यंत याचा प्रभाव होईल. याचा मोठा फटका पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, हरिहरेश्वर या ठिकाणी बसण्याचा अंदाज आहे. कोकणात जोरदार पाऊसही होईल, असा इशारा देण्यात आला आहे. (Safety Tips during Cyclone Nisarga)

संपूर्ण राज्यात 4 जूनपर्यंत चांगला पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीवर हे वादळ घोंघावण्याची चिन्हं आहेत. त्या पार्श्वभूमीवर पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये प्रशासनाकडून काटेकोर नियोजन करण्यात येत आहे.

चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र

1. प्रथमोपचार पेटी तयार ठेवा, औषध गोळ्या असू द्या 2. पाणी उकळूनच प्या, थंड पाणी टाळा 3. सगळी इलेक्ट्रीक उपकरणं बंद करा, गॅसही बंद ठेवा 4. दारं, खिडक्या बंद ठेवा 5. घराचं काम पूर्ण करा, टोकदार गोष्टी बांधून ठेवा 6. तुमची महत्वाची कागदपत्रं वॉटरप्रुफ करून ठेवा 7. मोबाईल चार्ज करुन ठेवा, एसएमएसचा वापर करा 8. जर तुमचं घर असुरक्षित असेल तर सुरक्षित ठिकाण गाठा 9. मोडकळीस आलेल्या इमारती किंवा घरात जाऊ नका 10. विद्युत तार, खांब यापासून दूर राहा 11. समुद्रात किंवा किनारी जाऊ नका 12. जनावरं, प्राण्यांना बांधून न ठेवता मोकळं सोडा 13. माहितीसाठी न्यूज चॅनल, रेडिओ ऐकत राहा 14. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका 15. फक्त प्रशासनाच्या सूचना वेळेच्या वेळेला लक्षात असू द्या

(Safety Tips during Cyclone Nisarga)

पहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

चक्रीवादळाचा संभाव्य धोका, मुंबईकरांसाठी महापालिकेच्या महत्त्वाच्या सूचना

रायगडमध्ये 3 जूनला जनता कर्फ्यू, आपत्ती व्यवस्थापनासह नॉन कोव्हिड रुग्णालयही उपलब्ध

(Safety Tips during Cyclone Nisarga)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.