बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर बस पलटली, तिघांचा मृत्यू

रोहित पाटील टीव्ही 9 मराठी, सोलापूर : लक्झरी बस पलटी होऊन सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. यात तीन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता वर्तवली जात आहे. बार्शी-कुर्डुवाडी मार्गावरील […]

बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर बस पलटली, तिघांचा मृत्यू
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

रोहित पाटील टीव्ही 9 मराठी, सोलापूर लक्झरी बस पलटी होऊन सोलापूर जिल्ह्यातील बार्शी-कुर्डुवाडी मार्गावर तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घटली आहे. यात तीन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला असून 15 हून अधिक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर जखमींना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्याता वर्तवली जात आहे.

बार्शी-कुर्डुवाडी मार्गावरील वांगरवाडी शिवारात हा अपघात घडला. अपघातात आर्वी मोहन देवकते(वय 2)(रा. विदंगी खुर्द ता.अहमदपूर, लातूर), फैज इस्माईल पठाण (वय 2)(रा. दामुननगर आदिवली, मुंबई) आणि धनश्री ज्ञानेश्वर मुकनर (वय12)(रा. हिप्परगा(शहा)ता. कंदार, नांदेड) या तीन जणांचा मृत्यू झाला आहे.

नांदेड जिल्ह्यातील मुखेडहून मुंबईच्या दिशेने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या लक्झरी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यावेळी चालक दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

याबाबत लक्झरी चालकाविरुद्ध पोलिसात तक्रार केली असून पोलीस पुढील तपास करत आहे.

पाहा व्हिडीओ :