बीडमध्ये थरार, रेल्वेचा ताबा घेतलेल्या मनोरुग्णाकडून रेल्वे पळवण्याचा प्रयत्न

| Updated on: Jun 25, 2019 | 2:41 PM

बीड जिल्ह्यातील परळीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. एका मनोरुग्णाने थेट रेल्वेचा ताबा घेऊन, रेल्वे चालविण्याचा  प्रयत्न केला.

बीडमध्ये थरार, रेल्वेचा ताबा घेतलेल्या मनोरुग्णाकडून रेल्वे पळवण्याचा प्रयत्न
Follow us on

बीड : बीड जिल्ह्यातील परळीत काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. एका मनोरुग्णाने थेट रेल्वेचा ताबा घेऊन, रेल्वे चालविण्याचा  प्रयत्न केला. त्याच्या या प्रयत्नामुळे रेल्वेतील हजारो प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला. रेल्वेच्या मोटरमनने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे अनर्थ टळलाच, शिवाय हजारो प्रवाशांच्या जीवात जीव आला.

परळी-अकोला रेल्वेत हा थरार पाहायला मिळाला.  या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपण उघड झाला आहे. जवळपास 40 मिनिटे हा मनोरुग्ण इंजिनमध्येच बसून होता. सुमारे अर्ध्या तासानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले आणि त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं.

मनोरुग्ण तब्बल 40 मिनिटे इंजिनमध्ये बसून होता. शिवाय तो रेल्वे चालवण्याचाही प्रयत्न करत असल्यामुळे प्रवाशांचा एकच थरकाप उडाला. जर त्याने ट्रेन सुरु करुन पुढे नेली असती, तर काय झालं असतं याचा अंदाजच न लावलेला बरा.

परळी ते अकोला ही रेल्वे सव्वा 1 च्या सुमारास परळी स्टेशनवर होती. त्यावेळी एका व्यक्तीने थेट इंजिनचा ताबा घेतला. अनेकांना हा रेल्वेचा मोटरमनच असल्याचं वाटलं. तब्बल 40 मिनिटांनी रेल्वे प्रशासनाला तो मोटरमन नसल्याचं जाणवलं आणि त्याला बाहेर काढण्यात आलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.

VIDEO :