बेळगावात ‘ग्राहक देवो भव:’, दारुच्या दुकानात हार घालून पहिल्या ग्राहकाचं स्वागत

| Updated on: May 04, 2020 | 5:09 PM

बेळगाव येथे दारुची दुकानं उघडताच पहिल्या ग्राहकाचे "ग्राहक देवो भव:" म्हणत ग्राहकाला हार घालून त्याचं स्वागत करण्यात आलं.

बेळगावात ग्राहक देवो भव:, दारुच्या दुकानात हार घालून पहिल्या ग्राहकाचं स्वागत
Follow us on

बेळगाव : कंटेनमेंट झोन वगळता ‘रेड झोन’मध्ये (Belgaum Wine Shops Open) येणाऱ्या जिल्ह्यात मद्यविक्रीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर आज म्हणजेच सोमवारपासून दारु दुकानं सुरु झाली आहे. सकाळपासूच ‘वाईन शॉप्स’वर तळीरामांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिकसह अनेक ठिकाणी मद्य प्रेमींना लांबच लाबं रांगा लावल्या. कर्नाटक सीमेवरील बेळगाव इथलीही दरुची दुकाने सुरु झाली आहेत. दारु खरेदीसाठी दुकानांवर भल्या मोठ्या रांगा (Belgaum Wine Shops Open) लागल्या आहेत.

बेळगाव येथे दारुची दुकानं उघडताच पहिल्या ग्राहकाचे “ग्राहक देवो भव:” म्हणत ग्राहकाला हार घालून त्याचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर विक्रीला सुरवात करण्यात आली. गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनमुळे दारुची दुकानं बंद होती. आज ती उघडली, त्यामुळे तळीरामांचा कोरडा घसा आज ओला होणार असल्याने मद्यप्रेमी खुश असल्याचे चित्र आहे.

रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय नाही याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने शुक्रवारी नवी नियमावली जारी केली. यानुसार, गृहमंत्रालयाने दारुची दुकानं, पानटपऱ्या, ब्युटी पार्लर आणि सलून उघडण्याची परवानगी दिली. त्यासंबंधी काही नियम ठरवण्यात आले (Belgaum Wine Shops Open).

– दुकानांवर एकमेकांपासून जवळपास सहा फुटांचं अंतर ठेवावं.

– दुकानावर एकावेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती नको.

या नियमांनुसार, ऑरेंज आणि ग्रीन झोन आणि रेड झोनमधील कंटेनमेंट झोन वगळता दारुची दुकानं उघडी ठेवता येणार आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील दारुची दुकानं उघडण्यात आली. यावेळी तळीरामांच्या लांबच लांब रांगा दुकानाबाहेर (Belgaum Wine Shops Open) पाहायला मिळाल्या.

संबंधित बातम्या :

LiquorShops | तळीरामांचा बांध फुटला, एकमेकांना चिकटून रांगा, दारुच्या मज्जेसाठी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

हातात पिशव्या घेऊन अर्धा किमी रांगा, पुण्यात वाईन शॉप्स न उघडल्याने तळीराम हिरमुसले