VIDEO : ‘कुणाला कधी खाली पाडायचं, जनतेला चांगलं ठाऊक’, उमेदवाराच्या भाषणादरम्यानच स्टेज कोसळला

| Updated on: Oct 29, 2020 | 3:48 PM

बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत विचित्र प्रकार घडला (Mashkoor Usmani stage collapse).

VIDEO : कुणाला कधी खाली पाडायचं, जनतेला चांगलं ठाऊक, उमेदवाराच्या भाषणादरम्यानच स्टेज कोसळला
Follow us on

पाटणा : बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारसभेत विचित्र प्रकार घडला. काँग्रेस उमेदवार मशकूर अहमद उस्मानी यांचं भाषण सुरु असताना अचानक स्टेज खाली कोसळला. त्यामुळे काँग्रेस उमेदवार उस्मानी यांच्यासह स्टेजवरील सर्व लोक खाली पडले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडयावर प्रचंड व्हायरल होत आहे (Mashkoor Usmani stage collapse).

व्हिडीओत स्टेज कोसळ्यापूर्वी उस्मानी आपल्या भाषणात विरोधकांवर निशाणा साधताना दिसत आहेत. “जनतेला चांगलं सरकार निवडण्याची संधी मिळते. लोकशाहीत सगळ्यांना ठाऊक आहे की, कुणाला कधी उचलायचं आणि कुणाला कधी पाडायचं”, असं उस्मानी बोलले. उस्मानी यांच्या या वाक्यानंतर लगेच ते ज्या मंचावर उभे होते, तो मंच खाली कोसळला. त्या मंचासोबत तेदेखील कार्यकर्त्यांसह खाली पडले.

मशकूर अहमद उस्मानी कोण आहेत?

काँग्रेस नेते मशकूर अहमद उस्मानी हे बिहारच्या दरभंगा जिल्ह्यातील जाले विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत. याआधी ते उत्तर प्रदेशमधील अलिगड मुस्लिम युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी संघटन प्रमुख होते (Mashkoor Usmani stage collapse).

हेही वाचा : Bihar Election | मत द्यायचे नसेल तर नका देऊ, लालूप्रसादांच्या जयघोषामुळे नितीश कुमार भडकले