Bihar Election 3rd phase : मोठ्या राजकीय पक्षांच्या 50 टक्के उमेदवारांवर फौजदारी खटले

| Updated on: Nov 06, 2020 | 10:49 PM

बिहार निवडणुकीचं तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 नोव्हेंबर रोज पार पडत आहे.

Bihar Election 3rd phase : मोठ्या राजकीय पक्षांच्या 50 टक्के उमेदवारांवर फौजदारी खटले
Follow us on

पाटणा : बिहारमध्ये उद्या (7 नोव्हेंबर) रोजी तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यतलं मतदान पार पडतंय. (Bihar Vidhansabha Election) यात विविध पक्षाकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांपैकी 50 टक्क्याहून अधिक उमेदवार हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. यासंबंधीची गंभीर आकडेवारी समोर आली आहे. (Bihar Election 50 percent Candidate Criminal Cases Political party)

उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीविषयी जाणून घेण्यासाठी आकडेवारी पाहिली असता, भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे 76 टक्के उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आरजेडीचे 73 जेडीयू 57 टक्के एलजेपीचे 43 टक्के उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. ही माहिती या उमेदवारांनी निवडणूक आयोगाला सांगितली आहे.

भाजप, काँग्रेस आणि आरजेडीच्या प्रत्येक दुसऱ्या उमेदवारावर गंभीर प्रकारचा गुन्हा दाखल आहे. भाजपच्या दोन तृतीअंश उमेदवारांनी आपल्या नावावर गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असल्याची माहिती निवडणूक आयोगाला दिली आहे. बिहार निवडणुकीतला शेवटचा टप्पा उद्या पार पडतोय. अशातच ही गंभीर बाब समोर आली आहे.

ज्या व्यक्तींच्या नावावर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे त्या व्यक्तीला उमेदवारी देऊ नये, असं मतदारराजाला वाटतं. या संदर्भात संबधित राजकीय पक्षांना विचारलं असता या उमेदवारांमध्ये निवडणून येण्याची क्षमता आहे, अशा प्रकारचं उच्चर देऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला जातो.

बिहारच्या निवडणुकीत शिक्षण, बेरोजगारी, नोकरी असे विषय चर्चेत आहेत. मात्र त्याचसोबतच उमेदवारांवर दाखल असलेले गुन्हे, त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या केसेस याचीही चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. बिहार निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे. इथले चर्चेतले मुद्दे, नेत्यांच्या होणाऱ्या सभा, दिली जाणारी आश्वासनं या मुद्द्यांबरोबरच उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्वभुमीचा मुद्दा देशभर चर्चेत आहे.

बिहार निवडणूक ही कोरोना काळात भारतात होत असलेली पहिली निवडणूक आहे. त्यातच बिहारच्या राजकारणातलं मोठं नाव लालूप्रसाद यादव हे या निवडणुकीत प्रत्यक्ष सहभागी होणार नाहीत. तर दुसरं महत्वाचं नाव म्हणजे केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचा काही दिवसांपुर्वी मृत्यू झाला. त्यामुळे अनुभवी नितीश कुमार विरुद्ध युवा नेते तेजस्वी यादव अशी लढत पहायला मिळत आहे.

(Bihar Election 50 percent Candidate Criminal Cases Political party)

संबंधित बातम्या

बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 53 टक्के मतदान

नितीश कुमारांवर भरसभेत कांदाफेक, बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर रोष