Sushant Singh Rajput | सुशांत प्रकरणात बिहारचे राजकारणी आपली पोळी भाजतायत, सर्व्हेचा दावा!

| Updated on: Oct 26, 2020 | 12:06 PM

एका सर्व्हेदरम्यान 62 टक्के लोकांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणात राजकारण सुरू असल्याचे मत नोंदवले आहे.

Sushant Singh Rajput | सुशांत प्रकरणात बिहारचे राजकारणी आपली पोळी भाजतायत, सर्व्हेचा दावा!
Follow us on

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर त्याच्या मृत्यू संदर्भात अनेक दावे केले गेले. त्याचा मृत्यू आत्महत्या नसून, हत्या असल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला होता. 14 जूनला सुशांत सिंह राजपूत त्याच्या घरात मृतावस्थेत आढळला होता. सीबीआय, एनसीबी, ईडी या तीनही संस्था या प्रकरणाचा तपास करत आहेत. सुशांतच्या मृत्यूने बिहारमधील (Bihar) राजकारण देखील तापले आहे. एका सर्व्हेदरम्यान 62 टक्के लोकांनी सुशांतच्या मृत्यू प्रकरणात राजकारण सुरू असल्याचे मत नोंदवले आहे. (Bihar survey Politics in Sushant singh rajput death case)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये एक सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेदरम्यान या प्रकरणावर नागरिकांनी आपली मते नोंदवली. सी-वोटर सर्वेक्षणानुसार 62.4 टक्के लोकांनी सुशांत सिंह राजपूतच्या नावावर राजकारण सुरू असल्याचे म्हटले आहे. तर, 37.6 टक्के लोकांनी या गोष्टीचा दावा फेटाळला आहे.

सुशांतचा मृत्यू बिहार राजकारणचा मुद्दा!

बिहारमधील मगध-भोजपूर, मिथिलांचल, सीमांचल आणि उत्तर बिहारसारख्या राजकीय क्षेत्रात सुशांतच्या मृत्यूवरील राजकारणावर 62 टक्केहून अधिक लोक सहमत झाले, तर पूर्व बिहारमध्ये 53.4 टक्क्यांहून कमी लोकांनी यावर आले होकारार्थी मत नोंदवले.

सुशांतचा मृत्यू आणि त्यानंतरच्या तपासाला बिहार निवडणुकीतील एक महत्त्वाचा विषय म्हणून पाहिले गेले. या मुद्द्यावर बरेच राजकारणी सक्रियपणे गुंतले होते. अभिनेत्याच्या मृत्यूबाबत सीबीआयचा तपास सुरू असून, बिहारसह इतरही अनेक राज्यात सुशांतला न्याय मिळावा, अशी मागणी करत मोहिमा राबवल्या जात आहेत.(Bihar survey Politics in Sushant singh rajput death case)

243 मतदार संघांचा समावेश

1 ते 23 ऑक्टोबर दरम्यान 30,678 लोकांसह हे सर्वेक्षण करण्यात आले. बिहारमधील (Bihar) सर्व, 243 विधानसभा मतदार संघांचा या सर्वेक्षणामध्ये समावेश करण्यात आला होता. या सर्वेक्षणात राज्य स्तरावर तीन टक्के जास्त किंवा कमी, तर क्षेत्रीय स्तरावर पाच टक्के अधिक किंवा कमी त्रुटी असण्याची शक्यता आहे.

हे सर्वेक्षण जनगणना प्रोफाइलच्या आधारे केले जाते. यात मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या व्यतिरिक्त विविध लिंग, वय, शिक्षण, ग्रामीण/शहरी, धर्म आणि जातीतील लोकांचा समावेश आहे. या सर्वेक्षणानुसार एनडीए सहज बहुमताने बिहारमध्ये सत्तेत येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे.(Bihar survey Politics in Sushant singh rajput death case)

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने (Sushant singh Rajput) 14 जून रोजी त्याच्या राहत्या घरात आत्महत्या करत आपले आयुष्य संपवले होते. या प्रकरणाच्या तपासादरम्यान बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शन समोर आले. या प्रकरणात सुशांतची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासह 23 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी रिया चक्रवर्ती सध्या जामिनावर तुरुंगाबाहेर आहे.

(Bihar survey Politics in Sushant singh rajput death case)