नावं एकसारखीच, जामीन एकाला आणि तुरुंगातून सुटका भलत्याचीच!

| Updated on: Jul 30, 2019 | 7:52 PM

ज्याला जामीनावर बाहेर यायचं होतं, तो तुरुंगातच राहिला आणि ज्याला शिक्षा भोगायची होती तो बाहेर आला. बिहारच्या सिवान जिल्ह्यात हा अजब प्रकार घडला.

नावं एकसारखीच, जामीन एकाला आणि तुरुंगातून सुटका भलत्याचीच!
Follow us on

पाटणा : ज्याला जामीनावर बाहेर यायचं होतं, तो तुरुंगातच राहिला आणि ज्याला शिक्षा भोगायची होती तो बाहेर आला. बिहारच्या सिवान जिल्ह्यात हा अजब प्रकार घडला. या जिल्ह्यातील तुरुंगात एकाच नावाचे दोन व्यक्ती शिक्षा भोगत होते. योगायोग म्हणजे हे दोन्ही आरोपी चोरीच्या गुन्ह्याखाली तुरुंगात शिक्षा भोगत होते. या दोघांनीही त्यांच्या-त्यांच्या वकिलामार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. या दोन्ही आरोपींची नावे गुल मोहम्मद होती.

या दोघांपैकी एक गुल मोहम्मद हा ओदीखोर गावातील राहाणारा होता. याची जामीन याचिका न्यायालयाने फेटाळली. त्यानंतर त्याने पाटणा उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला. यादरम्यान, सहसराव गाव येथील राहाणारा गुल मोहम्मद याचा जामीन मंजूर झाला. या गुल मोहम्मदला तुरुंगातून सोडण्याचे कागदपत्रही जारी करण्यात आले. मात्र,इथेच घोळ झाला.

रिलीज पेपरमध्ये सहसराव गावातील गुल मोहम्मदच्या जागी ओदीखोर गावातील गुल मोहम्मदची माहिती भरण्यात आली. यामुळे सगळा गोंधळ झाला आणि ज्या गुल मोहम्मदला जामीन मिळाला होता, तो तुरुंगातच राहिला आणि ज्याला जामीन नाकारला होता त्याला सोडण्यात आलं.

दुसरीकडे, जामीन मिळाल्यावरही जेव्हा सहसराव गावाचा गुल मोहम्मद बाहेर नाही आला, तेव्हा त्याच्या कुटुंबियांनी वकिलाकडे याबाबत तक्रार केली. वकिलाने माहिती दिल्यावर हा प्रकार पोलिसांच्या लक्षात आला. त्यानंतर खऱ्या गुल मोदम्मदला जामीनावर सोडण्यात आले. गैरसमज होऊन ज्या हुल मोदम्मदला जामीनावर बाहेर सोडण्यात आलं होतं त्याने लगेच आत्मसमर्पणही केलं.

संबंधित बातम्या :

राहुल गांधी नावाच्या तरुणाची पंचाईत, सिम कार्डही मिळेना, बँक कर्जही देईना

राज्यसेवेच्या परीक्षेत पतीचा पहिला आणि पत्नीचा दुसरा क्रमांक

सहमतीने ठेवलेले शारीरिक संबंध लग्नाला नकार दिल्याने बलात्कार होत नाहीत : हायकोर्ट

नवजात बालिकेला दुधाऐवजी चहा पाजला, चिमुकलीचा अंत