Birthday Special : आमिरचे ‘हे’ तीन रेकॉर्ड अजून कुणीही तोडले नाहीत!

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज 54 वाढदिवस साजरा करत आहे. आता आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट का म्हणतात हे तर सांगायची गरज नाही, आमिर वर्षाला एक सिनेमा करतो पण तो 100 टक्के सुपरहीट होईल याची शाश्वती असते. ते बॉक्स ऑफिसचे ट्रेंड सेटर आहेत. 100 कोटी क्लब आणि 300 कोटी क्लबची सुरुवात आमिरच्या सिनेमानेच झाली. […]

Birthday Special : आमिरचे ‘हे’ तीन रेकॉर्ड अजून कुणीही तोडले नाहीत!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:17 PM

मुंबई : मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आज 54 वाढदिवस साजरा करत आहे. आता आमिर खानला मिस्टर परफेक्शनिस्ट का म्हणतात हे तर सांगायची गरज नाही, आमिर वर्षाला एक सिनेमा करतो पण तो 100 टक्के सुपरहीट होईल याची शाश्वती असते. ते बॉक्स ऑफिसचे ट्रेंड सेटर आहेत. 100 कोटी क्लब आणि 300 कोटी क्लबची सुरुवात आमिरच्या सिनेमानेच झाली.

आमिर अगदी निवडक सिनेमे करतो. जर त्याला सिनेमाची कहाणी आवडली तरच तो सिनेमा करायला तयार होतो. त्याच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर त्याने बॉक्स ऑफिसवर अनेक बेंच मार्क सेट केले आहेत. भारतातच नाही तर विदेशातही आमिरचे सिनेमे खूप गाजतात. चीनमध्येतर आमिरचा मोठा चाहतावर्ग आहे.

आमिर खानच्या वाढदिवशी जाणून घेऊया त्याचे असे तीन विक्रम जे आजवर कुणीही तोडू शकलेलं नाही.

‘दंगल’ जगभरात सर्वात जास्त कमाई करणारा सिनेमा

आमिर खानचा ‘दंगल’ या सिनेमाने भारतात तर जबरदस्त कमाई केली, त्यासोबतच या सिनेमाने चीनमध्येही कमाईच्या बाबतीत एक नवा रेकॉर्ड केला. या सिनेमाला भारतीय प्रेक्षकांनी जेवढी पसंती दिली तेवढीच पसंती विदेशातही मिळाली. वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने 2000 कोटी रुपयांची कमाई केली. चीनमध्येही आमिरच्या ‘दंगल’ने चांगलाच गल्ला जमवला, त्यानंतर आता आमिरचा प्रत्येक सिनेमा हा चीनमध्ये प्रदर्शित केला जातो.

‘दंगल’ सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा

2016 साली आमिर खानचा ‘दंगल’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉलिवूडच्या उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. ‘दंगल’ने अनेक रेकॉर्ड आपल्या नावे केले, हा सिनेमा प्रेक्षकांच्याही पसंतीस पडला. इतकंच नाही तर हा सिनेमा आजवरचा सर्वाधिक कमाई करणारा हिंदी सिनेमा ठरला. ‘दंगल’ या सिनेमाचं लाईफटाईम कलेक्शन 387.38 कोटी रुपये आहे. तसं तर अनेकजण ‘बाहुबली’ला सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा समजतात. या सिनेमाने भारतात तब्बल 510.99 कोटींचा गल्ला जमवला. मात्र, हा सिनेमा हिंदी डब होता, त्यामुळे हा हिंदी सिनेमांमध्ये गणला जाऊ शकत नाही.

‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ भारतीय सिनेमातील सर्वात मोठी ओपनर ठरला

गेल्यावर्षी आमिर खानचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर आपटला गेला. तरी या सिनेमाने प्रदर्शनाच्या पहिल्याचं दिवशी एक रेकॉर्ड बनवला, जो आजवर कुणीही तोडू शकलेलं नाही. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर एतिहासिक ओपनिंग मिळाली. या सिनेमाने पहिल्याच दिवशी 52.25 कोटींचा गल्ला जमवला. त्यासोबतच या सिनेमाने ‘बाहुबली’, ‘हैप्पी न्यू ईयर’ आणि ‘संजू’ या सुपरहीट सिनेमांना मागे टाकले.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.