…अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरेल, भाजप खासदाराचा इशारा

| Updated on: Oct 09, 2020 | 9:54 AM

नागपुरात मराठा समाज, ओबीसी समाजानंतर आता धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. (BJP MP Vikas Mahatme On Dhangar Reservation) 

...अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरेल, भाजप खासदाराचा इशारा
Follow us on

नागपूर : गेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजासह ओबीसी समाजही आंदोलन करत आहेत. त्यानतंर आता धनगर समाजही आक्रमक झाला आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार गंभीर नाही, असा आरोप भाजप खासदार डॉ. विकास महात्मे यांनी केला आहे. तसेच धनगर समाजासाठी बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेले 100 कोटी तात्काळ द्यावे, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरु, असेही विकास महात्मे म्हणाले. (BJP MP Vikas Mahatme On Dhangar Reservation)

नागपुरात मराठा समाज, ओबीसी समाजानंतर आता धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक झाला आहे. ‘मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्य सरकार बैठका घेत आहेत, पण धनगर आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत एक ही  बैठक बोलवलेली नाही. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या मुद्दयावर सरकार गंभीर नाही’ असे स्पष्ट दिसत आहे, असा आरोप भाजप खासदार विकास महात्मे यांनी केला आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काळात बजेटमध्ये प्रोव्हिजन केलेले 100 कोटी तात्काळ द्यावे, अन्यथा धनगर समाज रस्त्यावर उतरेल, असा इशाराही विकास महात्मे यांनी दिला. (BJP MP Vikas Mahatme On Dhangar Reservation)

संबंधित बातम्या : 

10 ऑक्टोबरचा महाराष्ट्र बंद स्थगित; मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मराठा नेत्यांंची घोषणा

MPSC परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सरकार सकारात्मक : विनायक मेटे