सर्वाधिक आयकर भरणाऱ्यांच्या यादीत बिग बी, एका वर्षाच्या टॅक्सची रक्कम तब्बल 70 कोटी

मुंबई: बॉलिवूडचे शहनशाह अशी ओळख असलेले अभिनेते अमिताभ बच्चन  यांनी 2018-19 या आर्थिक वर्षात 70 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. यामुळे अमिताभ यांची 2018-19 आर्थिक वर्षातील सर्वाधिक करदात्यांपैकी एक ठरले आहेत. अमिताभ यांच्या प्रवक्त्यांनी याबाबतची माहिती दिली. अमिताभ बच्चन यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018-19 या आर्थिक वर्षात अमिताभ यांनी तब्बल 70 कोटी रुपये टॅक्स आयकर […]

सर्वाधिक आयकर भरणाऱ्यांच्या यादीत बिग बी, एका वर्षाच्या टॅक्सची रक्कम तब्बल 70 कोटी
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:02 PM

मुंबई: बॉलिवूडचे शहनशाह अशी ओळख असलेले अभिनेते अमिताभ बच्चन  यांनी 2018-19 या आर्थिक वर्षात 70 कोटी रुपये टॅक्स भरला आहे. यामुळे अमिताभ यांची 2018-19 आर्थिक वर्षातील सर्वाधिक करदात्यांपैकी एक ठरले आहेत. अमिताभ यांच्या प्रवक्त्यांनी याबाबतची माहिती दिली.

अमिताभ बच्चन यांच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2018-19 या आर्थिक वर्षात अमिताभ यांनी तब्बल 70 कोटी रुपये टॅक्स आयकर विभागाकडे जमा केला आहे. त्याशिवाय त्यांनी काही रक्कम देणगी स्वरुपात दानही केली आहे. तसेच पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबासाठीही त्यांनी 10 लाख रुपये दिले आहेत. विशेष म्हणजे अमिताभ यांनी बिहारच्या मुजफ्फरपूर या गावातील 2084 शेतकऱ्यांचे कर्ज स्वत:च्या पैशाने चुकवले आहे.

गेल्यावर्षी केरळमध्ये पावसामुळे हाहा:कार माजला होता. तेथे राहणाऱ्या लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले होते. अशा लोकांसाठी अमिताभ यांनी 51 लाख रुपयांची मदत दिली होती. अमिताभ यांनी केरळ पूरग्रस्तांसाठी  80 जॅकेट, 25 पॅंट, 20 शर्ट आणि काही स्कार्फही दिले होते.

अनेकदा राजकारणी, उद्योगपती, बिल्डर यांसारखे विविध लोक कर बुडवण्यासाठी विविध प्रकारच्या शक्कल लढवत असतात. पण अमिताभ यांनी  70 करोड रुपये आयकर जमा करत, त्यांच्या चाहत्यांसह सर्वांपुढे एक आदर्श ठेवला आहे. फक्त अमिताभ बच्चनच नाही तर सर्वाधिक आयकर भरणाऱ्यांच्या यादीत बॉलिवूडच्या अनेक कलाकारांचा समावेश आहे.

बॉलिवडूचे महानायक अमिताभ बच्चन यांनी आतापर्यंत अमर अकबर अँथोनी, परवरीश, मिस्टर नटवरलाल, शहेनशाह, अंधा कानून यांसारख्या विविध चित्रपटात काम केली आहेत. नुकतंच अभिनेत्री तापसी पन्नू हिच्यासोबत बदला या चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली आहे. गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेल्या बदला चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सध्या अमिताभ ब्रह्मास्त्र या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट या वर्षाअखेरीस  डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. यात अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरही अमिताभ यांच्यासोबत दिसणार आहेत.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.