Sushant Singh Rajput | चाहत्यांना सुखद धक्का, सुशांतचा पहिला मेणाचा पुतळा तयार

सुशांतच्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा हा पुतळा पाहून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे.

Sushant Singh Rajput | चाहत्यांना सुखद धक्का, सुशांतचा पहिला मेणाचा पुतळा तयार
| Updated on: Sep 18, 2020 | 1:43 PM

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा पहिला मेणाचा पुतळा बनवण्यात आला आहे. सुशांतच्या पुतळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा हा पुतळा पाहून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का बसला आहे (Sushant Singh Rajput Wax Statue).

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने गेल्या 14 जूनला मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूला आता तीन महिने झाले आहेत. मात्र, अजूनही त्याचे चाहते त्याला विसरु शकलेले नाही. सुशांतचे चाहते आजही त्याचे जुने फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

सुशांतचे चाहते त्याला स्पेशल व्हिडीओ, पेंटिंग आणि कार्ड्सच्या माध्यमातून त्याला श्रद्धांजली देत असतात. आता सुशांतचा पहिला मेणाचा पुतळा पश्चिम बंगालच्या आसनसोलमध्ये तयार करण्यात आला आहे. इथल्या संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा हा पुतळा सुकांतो रॉय (Sukanto Roy) यांनी बनवला आहे.

सुशांतचा हा पुतळा लॉन्च केल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. हा पुतळा त्याच्या चाहत्यांच्या अत्यंत पसंतीस पडत आहे.

संबंधित बातम्या :

व्हिसेरा रिपोर्टची प्रतीक्षा, सुशांत सिंहच्या मृत्यूचं नेमकं कारण उलगडणार?