ईशा अंबानीच्या घरी होळी पार्टी, बॉलिवूड सेलिब्रिटींची धुळवड

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांनी आपल्या घरी होळी निमित्त पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले (Ambani Family holi party).

ईशा अंबानीच्या घरी होळी पार्टी, बॉलिवूड सेलिब्रिटींची धुळवड
| Updated on: Mar 07, 2020 | 12:24 PM

मुंबई : होळीला अजून दोन दिवस बाकी आहेत. मात्र, देशातील नागरिकांमध्ये आतापासूनच होळीचा जल्लोष बघायला मिळत आहे (Ambani Family holi party). विशेष म्हणजे बॉलिवूड सेलिब्रिटींनीदेखील होळी साजरी करायला सुरायला सुरुवात केली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानीने आपल्या घरी होळी निमित्त पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी सहभागी झाले (Ambani Family holi party).

अंबानींच्या होळी पार्टीचे फोटो आता सोशल मीडियामार्फत समोर येऊ लागले आहेत. या पार्टीत बॉलिवूड सेलिब्रिटी जल्लोष करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे या पार्टीत प्रियंका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसदेखील हजर होते. निक जोनस होळी खेळून प्रचंड आनंदी झाला. त्याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर या पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केली आहेत.

निक जोनस, प्रियंका चोप्रा, कट्रिना कैफ, जॅकलीन फर्नांडीस, डायना पेंटी, अनुशा दांडेकर, राजकुमार राव, हुमा कुरेशी सारखे अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी रंगांनी भरले असल्याचे फोटो सोशल मीडियावर बघायला मिळत आहेत. एका फोटोत निक जोनस, प्रियंका चोप्रा आणि कट्रिना कॅफ एकत्र दिसत आहेत. हा फोटो सोशल मीडियावरही प्रचंड व्हायरल होत आहे.