शौचालयाच्या टाकीत पडलेला मोबाईल काढताना बाप-लेकाचा मृत्यू

| Updated on: Jun 22, 2020 | 4:48 PM

शौचालयाच्या टाकीत पडलेला मोबाईल काढताना बाप- लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यात घडली. Buldhana father son death

शौचालयाच्या टाकीत पडलेला मोबाईल काढताना बाप-लेकाचा मृत्यू
Follow us on

बुलडाणा : शौचालयाच्या टाकीत पडलेला मोबाईल काढताना बाप- लेकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुलडाण्यात घडली. नांदुरा तालुक्यातील नीमगांव इथे घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. शिवाय ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. (Buldhana father son death)

नीमगांव येथील 25 वर्षीय अनिकेत टवलारकर हा मुलगा घराजवळील त्यांच्या शौचालयात गेला होता. यावेळी त्याच्या जवळील मोबाईल टाकीत पडला. अनिकेतने तो काढताना त्याचा तोल गेल्याने तो टाकीत पडला. त्याचा आवाज ऐकून त्याचे वडील ही त्याला बाहेर काढण्यासाठी टाकीत उतरले. मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती. यावेळी 55 वर्षीय मधुकर टवलारकर यांचाही मृत्यू झाला. तर गंभीर अवस्थेत असलेला त्यांचा मुलगा अनिकेत याला रुग्णालयात नेत असतान रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.

दोघांनाही बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली. यावेळी घटनास्थळावर पोलीस, महसूल प्रशासन, आरोग्य पथक दखल झाले होते. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

ग्रामीण भागात जुन्या पद्धतीची शौचालयं आहेत. खड्डा खणून त्यावर एक झाकण बनवून अशी शौचालयं बांधली जातात. मात्र ही शौचालयं किती धोकादायक आहेत, हे या प्रकारावरुन दिसून येतं. दुसरीकडे शौचाला जाताना मोबाईल घेऊन जाणंही घातक आहे हे यापूर्वी अनेक प्रकारातून सिद्ध झालं आहे.

(Buldhana father son death)

संबंधित बातम्या 

फ्लश करण्याआधी टॉयलेटचे कव्हर बंद करा, अन्यथा कोरोना विषाणू पसरु शकतो, चीनच्या शास्त्रज्ञांचा दावा  

देशातील टॉप 3 स्वच्छ स्थानकांमध्ये मुंबईच्या ‘या’ स्थानकांचा समावेश