अडीच तासात 70 माकडं जेरबंद, मंकी मॅनने कमावले 30 हजार

| Updated on: Aug 02, 2020 | 4:32 PM

बुलडाण्यातील चिखली तालुक्यात एका मंकी मॅनने अडीच ते तीन तासात जवळपास 70 माकडं (Buldhana monkey man catch 70 monkeys) पकडली.

अडीच तासात 70 माकडं जेरबंद, मंकी मॅनने कमावले 30 हजार
Follow us on

बुलडाणा : माकडांमुळे गावा-गावात शेतमालाचे नुकसान होते. त्यामुळे शेतकरी त्रस्त होतात. पण आता शेतातील शेतमालाचे नुकसान करणारे माकडं पकडणारा मंकी मॅन जिल्ह्यात आला आहे. समाधान गिरी असे या मंकी मॅनचे नाव आहे. त्याने अडीच तासात तब्बल 70 माकडं पकडून 30 हजार रुपयांची कमाई केली आहे. यामुळे शेतकऱ्यांना माकडांपासून होणारा त्रास वाचणार आहे. (Buldhana monkey man catch 70 monkeys)

बुलडाण्यातील चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे या गावात माकडांचा खूप त्रास होतो. फक्त गावातच नव्हे तर ही माकडं शेतात शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करायचे. यामुळे कंटाळलेल्या ग्रामस्थांनी माकडं पकडणाऱ्या एका मंकी मॅनला बोलवून घेतले.

माकडं पकडणारा व्यक्ती असल्याचे समजल्यावर ग्रामस्थांनी 30 हजार रुपये वर्गणी जमा केली. त्यानंतर त्यांनी सिल्लोड तालुक्यातील समाधान गिरी या मंकी मॅनला बोलावून घेतले. या मंकी मॅनने पाहता पाहता त्यांनी अडीच ते तीन तासात जवळपास 70 माकडं पकडली.

यानंतर गावकऱ्यांनी या माकडांचे काय करणार असे विचारले असता, त्यांनी मी या पकडलेल्या माकडांना ते जंगलात सोडून देतात. त्यामुळे ते माकडे परत गावाकडे येत नाहीत. समाधान गिरी यांच्याकडे माकडे पकडण्याची कला ही वंशपरंपरागत असल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या 20 वर्षांपासून गिरी हे माकडे पकडतात. शेतकऱ्यांचे, ग्रामस्थांचे होणारे नुकसान होण्यापासून वाचवतात. मात्र समाधान गिरी यांची अडीच ते तीन तासांची कमाई ही एखाद्या अधिकाऱ्याला लाजवेल अशीच आहे. (Buldhana monkey man catch 70 monkeys)

संबंधित बातम्या : 

कंत्राटदाराचा टेंडरवरुन वाद, खुन्नस काढण्यासाठी अधिकाऱ्याच्या हत्येची सुपारी, वर्ध्यातील धक्कादायक घटना

Ganeshotsav 2020 | कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल : प्रवीण दरेकर