एक दिवसाच्या आमदार सविता पानकर यांचं निधन; लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न अधुरं

| Updated on: Nov 06, 2020 | 5:33 PM

महिला दिनी एक दिवसाची आमदार झालेल्या सविताचा कर्करोगाने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

एक दिवसाच्या आमदार सविता पानकर यांचं निधन; लाल दिव्याच्या गाडीचं स्वप्न अधुरं
Follow us on

बुलडाणा : एक दिवसाच्या आमदार सविता पानकरचं निधन झालं आहे (Savita Pankar Died). सविताच्या मृत्यूने तिचं लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न अपूर्ण राहिलं आहे. सविता कर्करोगाने ग्रस्त होती. अखेर तिची कर्करोगाशी झुंज अयशस्वी ठरली (Savita Pankar Died).

उच्च शिक्षण घेऊन आपल्या प्रबळ पंखांनी भरारी घेऊन जनतेची सेवा करण्याची सविता पानकर या तरुणीची इच्छा अपूर्णच राहिली. महिला दिनी एक दिवसाची आमदार झालेल्या सविताचा कर्करोगाने उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे या तरुणीचे उंच शिखर गाठून लाल दिव्याच्या गाडीचे स्वप्न अधुरेच राहिले.

बुलडाणा शहरात राहणाऱ्या सविताच्या कुटुंबाची अत्यंत हालाखीची परिस्थिती आहे. लहान असतानाच तिच्या आईचा मृत्यू झाल्याने वडील-आजोबांनी मोलमजुरी करुन तिचे पालनपोषण केलं. सविताने मोठ्या जिद्दीने अभ्यास करत परिस्थिती बदलण्याचा ध्यास मनाशी धरुन अर्थशास्त्रामध्ये पदवी पूर्ण करत बीएड केले. मात्र, या सर्वांमध्ये तिला कर्करोगाने ग्रासले. त्यामुळे तिची मोठ्या अधिकारी बनणे आणि लाल दिव्याच्या गाडीची इच्छा ही अपूर्णच राहिली.

कॅन्सर ग्रस्तासाठी समाजात राहून काम करण्याची इच्छा होती. मात्र, हे नियतीला मंजुर नव्हते. तिचा काल (5 नोव्हेंबर) उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. सविताला काही क्षणाचा का होईना आनंद देण्याचा प्रयत्न बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी केला होता.

8 मार्च महिला दिनी सविताला एक दिवसाचं आमदार त्यांनी केले होते. मात्र, लाल दिव्याच्या गाडीतून फिरण्याची इच्छा या तरुणीची अपूर्णच राहिली. सविताच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे (Savita Pankar Died).

संबंधित बातम्या :

बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, 5 वर्षाच्या मुलासह तिघांना डिस्चार्ज