गाडी पार्क करुन जहीर टॉयलेटला गेला, तेवढ्यात चोरट्याने कार पळवली

गाडी पार्क करुन जहीर टॉयलेटला गेला, तेवढ्यात चोरट्याने कार पळवली

नवी दिल्ली : सायबर सिटी गुरुग्राममधील आणखी एक घटना समोर आली आहे. गुरुग्राममधील अत्यंत वर्दळीच्या ब्रिस्टल चौकातून एका तरुणाने अत्यंत सहजपणे कार चोरुन नेली. कार चालक रस्त्याच्या बाजूला पार्क करुन टॉयलेटसाठी गेला, तेवढ्या वेळातच कार चालकासमोर या तरुणाने गाडी पळवून नेली. या चोरट्याला पकडण्याचाही प्रयत्न केला, पण तो हाती लागला नाही.

राजधानी दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममधील गुन्हेगारी हा अत्यंत गंभीर विषय बनलाय. त्यातच ही कार चोरीची घटना समोर आली आहे. कार चालकाने पोलिसांना या घटनेबाबत तातडीने माहिती दिली. पोलिसांनी घटनेची नोंद करुन चौकशी सुरु केली आहे. 27 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली होती.

पोलिसांच्या माहितीनुसार, जहीर खान असं कार चालकाचं नाव आहे. त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. गुरुग्राममधीलच एका गावातील जहीर खानने आपली कार चोरी गेल्याची तक्रार दिली. गुरुग्रामहून गावी परत जात असताना टॉयलेटसाठी ब्रिस्टल चौकात गाडी पार्क केली. तेवढ्यातच चोराने गाडी पळवून नेली.

चोरट्याने गाडीचा दरवाजा उघडतानाही कार चालकाने पाहिलं. पण तो काही प्रयत्न करणार एवढ्यातच चोरटा फरार झाला. कार चालकाने या घटनेनंतर पोलिसांना फोन करुन माहिती दिली. पोलीसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले, पण तोपर्यंत चोरट्याने पोबारा केला होता. पोलिसांनी अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करत तपास सुरु केलाय.

Published On - 4:58 pm, Tue, 5 March 19

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI