भाजपच्या विजयावर जुही चावला म्हणते, “हर बार मोदी सरकार”
मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या इतक्या मोठ्या प्रक्रियेनंतर अखेर आज या निवडणुकांचा निकाल लागला. यंदाच्या लोकसभेतही जनतेने मोदी सरकारला भरघोस मतांनी विजयी केलं आहे. म्हणजेच यावेळी पुन्हा भाजप पक्ष सत्तेत आला आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये अनेक कलाकारांनीही आपलं नशीब आजमावलं. त्यापैकी काही जिंकून आले तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा इंडस्ट्रीतील सनी देओल, उर्मिला मातोंडकर, प्रकाश […]

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या इतक्या मोठ्या प्रक्रियेनंतर अखेर आज या निवडणुकांचा निकाल लागला. यंदाच्या लोकसभेतही जनतेने मोदी सरकारला भरघोस मतांनी विजयी केलं आहे. म्हणजेच यावेळी पुन्हा भाजप पक्ष सत्तेत आला आहे. यंदाच्या निवडणुकांमध्ये अनेक कलाकारांनीही आपलं नशीब आजमावलं. त्यापैकी काही जिंकून आले तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला. यंदा इंडस्ट्रीतील सनी देओल, उर्मिला मातोंडकर, प्रकाश राज, नुसरत जहां यांच्यासह अनेक कलाकारांनी निवडणूक लढवली. यामध्ये गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून भाजप उमेदवार सनी देओल हे बहुमताने निवडून आले, तर उत्तर मुंबईतून काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला.
भाजपप्रणीत एनडीएचा दणदणीत विजय झाल्याने, देशातूनच नाही तर जगभरातून मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यातच बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटिंनीही मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटिंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
अभिनेत्री जूही चावला हिने लिहिले की, “लॅण्डस्लाईट व्हिक्टरीसाठी आमच्या पंतप्रधानांना अनेक शुभेच्छा. हर बार मोदी सरकार”.
Wishing our PM a landslide victory ..!!!!!! ??????? HAR BAAR MODI SARKAAR …!!! @narendramodi
— Juhi Chawla (@iam_juhi) May 23, 2019
गायिका आशा भोसले यांनी लिहिलं, “भारतीय मतदारांनी समजूतदारपणे मत दिलं. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, एनडीए, भाजप पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सर्वांना शुभेच्छा, ज्यांनी देशासाठी मेहनत केली. जय हिंद”
The Indian electorate has voted wisely. Congratulations to Hon. PM Modi, NDA & all BJP party cadres who have worked tirelessly to take our country into a Golden Age that is long overdue. Jai Hind ??
— ashabhosle (@ashabhosle) May 23, 2019
आधी अभिनेता आणि मग नेता बनलले प्रकाश राज लिहितात, “ही माझ्यासाठी जोरदार चपराक आहे. कारण यानंतर मला आणखी शिव्या, ट्रोलिंग आणि अपमान सहन करावा लागेल. पण मी माझ्या वक्तव्यावर कायम राहिल. धर्म निरपेक्ष भारतासाठी माझा लढा कायम राहिल. कठीण प्रवासाला आता नुकतीच सुरुवात झाली आहे. या प्रवासात माझी साथ देण्यासाठी धन्यवाद. जय हिंद.”
a SOLID SLAP on my face ..as More ABUSE..TROLL..and HUMILIATION come my way..I WILL STAND MY GROUND ..My RESOLVE to FIGHT for SECULAR INDIA will continue..A TOUGH JOURNEY AHEAD HAS JUST BEGUN ..THANK YOU EVERYONE WHO WERE WITH ME IN THIS JOURNEY. …. JAI HIND
— Prakash Raj (@prakashraaj) May 23, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बायोपिकमध्ये त्यांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेता विवेक ओबेरॉयनेही मोदी सरकारला शुभेच्छा दिल्या. त्याने ट्वीटरवर सिनेमाचं एक पोस्टर शेअर केलं, या पेस्टरवर ‘आ रहे हैं दोबारा पीएम नरेंद्र मोदी अब कोई रोक नहीं सकता’, असं लिहिलेलं आहे.
#PMNarendraModi #PMNarendraModiOn24thMay pic.twitter.com/HNRa99TNrY
— Vivek Anand Oberoi (@vivekoberoi) May 23, 2019
अभिनेता रितेश देशमुखनेही ट्वीट केलं. “भारताने निर्णय घेतला आहे. आता लोकशाहीचा उत्सव साजरा कररायचा आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना या शानदार विजयासाठी खूप खूप शुभेच्छा.”
India ?? has decided- Democracy needs to be celebrated. Many Congratulations to our Hon Prime Minister @narendramodi ji on this huge verdict.
— Riteish Deshmukh (@Riteishd) May 23, 2019
निर्माती एकता कपूरनेही स्मृती इराणींसाठी एक पोस्ट शेअर केली. एकताने इंस्टग्रामवर लिहिले, “आमची नजर अमेठीवर आहे.”