Agriculture Acts | कृषी कायद्यांद्वारे मोदी सरकारचे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ऐतिहासिक पाऊल-संजय धोत्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल, असल्याचे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. ( Agriculture act is historical move of Modi Govt for farmers)

Agriculture Acts | कृषी कायद्यांद्वारे मोदी सरकारचे शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी ऐतिहासिक पाऊल-संजय धोत्रे
Yuvraj Jadhav

|

Oct 05, 2020 | 4:49 PM

अकोला : देशाच्या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या हितार्थ कृषी कायद्यामध्ये बदल करण्यात आले. शेतकऱ्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांच्या शेतमालाला दुप्पट भाव मिळवून देण्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल, असल्याचे प्रतिपादन केंद्रीय शिक्षण दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. ( Agriculture act is historical move of Modi Govt for farmers)

कृषी कायदे मंजूर करत स्वामिनाथन समितीचा अहवाल लागू करून तसेच शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या नेतृत्वाखालील समितीने सुचविलेल्या सूचनांच्या आधारे निर्णय घेण्यात आला. शेतकऱ्यांच्या अनेक दिवसांच्या मागणीची पूर्तता नवीन कृषी कायद्यामुळे होत असल्याने सर्व सामान्य शेतकरी आनंदित, असल्याची भूमिका धोत्रे यांनी मांडली.

शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळवून देणे, कृषी उत्पादन व उत्पन्न वाढवणे, शेतकऱ्यांचे सबलीकरण, संरक्षण, आणि रास्त किंमत मिळावी या करिता शाश्वत असा कृषी सेवा कायदा करण्यात आला आहे. कृषी सुधारणा कायद्यांद्वारे मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. विरोधी पक्ष मात्र खोटा प्रचार करत आहेत. विरोधी पक्षाने या निर्णयाबाबत चर्चा करायला हवी होती मात्र तसे त्यांनी केले नाही. कांदा निर्यात बंदी समर्थनीय नाही,लवकरच निर्यात बंदी उठावी याबाबत प्रयत्न करू, असे आश्वासन संजय धोत्रे यांनी दिले.

दरम्यान, भाजप सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यांना विविध राज्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला होता. पंजाब, हरियाणा, तेलंगाणा, आध्रप्रदेश ओडिसा आदी राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने पंजाबमधून खेती बचाव यात्रा सुरु करण्यात आली आहे. तर भाजपाच्या वतीने सर्वत्र कृषी कायद्यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषदांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे मराठवाड्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी लातूर आणि उस्मानाबादमध्ये पत्रकार परिषदांचे आयोजन केले होते.

संबंधित बातम्या: 

अकोला जिल्हा परिषद निवडणूक : भाजप खासदार संजय धोत्रेंनी मतदान केलं

2019 मध्ये पुन्हा युतीचंच सरकार येईल : मंत्री संजय धोत्रे

( Agriculture act is historical move of Modi Govt for farmers)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें