श्रेयवादाच्या लढाईत वीज बिलमाफी अडकली?, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्र्यांची फाईल फेटाळत असल्याचा बावनकुळेंचा आरोप

| Updated on: Nov 17, 2020 | 4:14 PM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नितीन राऊत यांची फाईल फेटाळत असल्याची टीका बावनकुळे यांनी केली आहे. राज्य सरकारनं ऊर्जा खात्याला 7 ते 8 हजार कोटी रुपये अनुदान दिल्याशिवाय वीज बिल माफी शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय.

श्रेयवादाच्या लढाईत वीज बिलमाफी अडकली?, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ऊर्जामंत्र्यांची फाईल फेटाळत असल्याचा बावनकुळेंचा आरोप
Follow us on

चंद्रपूर: राज्यातील 3 पक्षांच्या श्रेयवादाच्या लढाईत वीज बिल माफी अडली, असा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नितीन राऊत यांची फाईल फेटाळत असल्याची टीकाही बावनकुळे यांनी केली आहे. राज्य सरकारनं ऊर्जा खात्याला 7 ते 8 हजार कोटी रुपये अनुदान दिल्याशिवाय वीज बिल माफी शक्य नसल्याचंही त्यांनी म्हटलंय. सरासरी वीज बिलात दुरुस्ती आणि 1200 युनिटपर्यंत वीज बिलमाफीचा शब्द सरकार फिरवत असल्याचा आरोपही बावनकुळे यांनी केला आहे. (Chandrasekhar Bavankule criticizes the state government on the issue of electricity bill waiver)

ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

सर्वसामान्यांना मोठा झटका बसणार आहे. कारण लोकांनी वीज‌ वापरली त्याचे बिल भरावे, कुठलीही वीजबिल माफी (Electricity Bill) मिळणार नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) म्हणाले. वाढीव वीज बिलातून सवलत देणे अशक्य असल्याचं नितीन राऊत यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्याचा पुनरुच्चार राऊत यांनी केला. लॉकडाऊनकाळात वीज ग्राहकांना वाढीव बिलांचा शॉक बसला. आधीच अनेकांचे रोजगार गेले, त्यात वाढीव वीजबिले आल्याने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले. सरकारकडून वीजबिलांमध्ये सवलत मिळेल अशी आशा होती, मात्र आता ऊर्जामंत्र्यांनी सवलत मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्याने, सर्वसामान्यांना शॉक बसला आहे.

नितीन राऊत नेमकं काय म्हणाले?

वीज वापरली तितकेच बिल आले पाहिजे. कोणाचे वीज कनेक्शन कट होणार नाही. योग्य बिल नसले तर त्याची तक्रार करावी मीटर पाहणी केली जाईल. राज्यात बिल सवलत याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी केली, पण केंद्र सरकारने मदत केली नाही. वीजबिल सवलत तूर्तास मिळेल असे वाटत नाही, असं नितीन राऊत म्हणाले.

सदाभाऊ खोत यांचा उर्जामंत्र्यांना सवाल

उर्जामंत्र्यांच्या भूमिकेवर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. “शेतकरी कामगाराचे कंबरडे मोडत चालले आहे मात्र तरीही गेंडयाच्या कातडीच्या सरकारला जाग कशी येत नाही?”, असा सवाल खोत यांनी विचारला आहे. “कोरोना काळात शेतकरी आणि कामगारांची वीज बिलं 100 टक्के माफ करायला पाहिजे मात्र गेंड्याची कातडं पांघरलेल्या राज्य सरकारला जाग यायला तयार नाही. विरोधात असताना शेतकरी कामगारांचा मोठा कळवळा आला होता मग आता सत्तेत आल्यावर काय झालं?”, असा सवाल खोत यांनी उर्जामंत्र्यांना विचारला आहे.

संबंधित बातम्या:

कोणतीही वीज बिलं माफ होणार नाहीत; ऊर्जामंत्र्यांचा सामान्यांना शॉक

‘विरोधात होता तेव्हा वीज बिलं माफ करा म्हणत होतात मग आता काय झालं?’, सदाभाऊ खोत यांचा उर्जामंत्र्यांना सवाल

Chandrasekhar Bavankule criticizes the state government on the issue of electricity bill waiver