पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस मनाई; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय

| Updated on: Nov 19, 2020 | 10:10 PM

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथे सार्वजनिक ठिकाणी छट पूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक ठिकाणी छटपूजेस मनाई; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा निर्णय
Follow us on

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे तसेच पिंपरी-चिंचवड येथे सार्वजनिक ठिकाणी छटपूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने हा निर्णय घेतला आहे. या आधीही देशातील अनेक राज्यांनी सार्वजनिक ठिकाणी छटपूजा करण्यास मनाई केली आहे. (Chhat Puja in public places banned in Pune and Pimpri Chinchwad)

झारखंड, पश्चिम बंगाल, ओडीसा, दिल्ली अशा राज्यांत सार्वजनिक ठिकाणी छटपूजा करण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी छटपूजा करण्यावर निर्बंध घातले आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका प्रशासनाने कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता हा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने नागरिकांना घरीच छटपूजा करण्याचे आवाहन केले आहे.

हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे कार्तिक महिन्याच्या सहाव्या दिवशी छटपूजा केली जाते. दिवाळीच्या चौथ्या दिवशी ही पूजा होते. यावेळी सूर्यदेव आणि त्यांची पत्नी उषा यांचे आभार मानले जातात. त्यांचा आर्शीवाद घेण्यासाठी ही पूजा केली जाते. मात्र, कोरोनाचे संकट असल्यामुळे दिवाळीसोबतच इतर सणही साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन देशीतील बहुतांश राज्यांनी केले आहे.

दरम्यान, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षीचा उत्तर भारतीयांचा छटपूजा उत्सव साधेपणाने साजरा करावा असं गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister anil deshmukh) यांनी या आधीच आवाहन केलेलं आहे. त्या अनुषंगाने शासनाने काही मार्गदर्शक सूचनादेखील निर्गमित केलेल्या आहेत. त्याचे पालन करावे आणि आनंद साजरा करावा असे देशमुख यांनी म्हटलेले आहे.

मार्गदर्शक सूचना

1) कोरोनाचा संसर्ग वाढू नये या दृष्टीने नागरिकांनी तलाव, समुद्राकाठी एकत्रित न येता गर्दी टाळावी.  नागरिकांनी घरीच थांबून साध्या पद्धतीनेच छटपूजा साजरी करावी.

2) महानगरपालिका, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी, तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये याकरीता सुरक्षा आणि स्वच्छतेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात.

3) छटपूजा उत्सवाच्या ठिकाणी कोणत्याही स्वरुपाचे मंडप उभारण्यात येऊ नयेत. तसेच कोणत्याही प्रकारचे धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नयेत. फटाक्यांची आतषबाजी व ध्वनीक्षेपणास बंदी असेल.

4) उत्तर भारतीय नागरीकांनी छटपूजेदरम्यान मास्कचा वापर व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे तसेच ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणू नये, यासंबंधी आयोजकांनी जनजागृती करावी. (Home Minister anil deshmukh issues guidelines for Chhath Puja celebrations)

5) छटपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. सोशल डिस्टन्सिंग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सॅनिटायझर .) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.

संबंधित बातम्या :

Pune | 50 हजार टेस्ट किट, अडीच हजार खाटा, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी पुणे प्रशासन सज्ज

Nawab Malik | मुंबईत समुद्र किनारी छटपुजेवर बंदी, गर्दीच्या ठिकाणी पूजा नाही : नवाब मलिक

छटपूजा साजरी करण्यासाठी भाजप आग्रही; मुंबईत शिवसेना-भाजपचा ‘सामना’ रंगणार

(Chhat Puja in public places banned in Pune and Pimpri Chinchwad)